पोलीस दल अधिक मजबूत करण्यावर भर : पालकमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:41 AM2019-09-19T00:41:18+5:302019-09-19T00:42:16+5:30

पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Emphasis on strengthening police force: Guardian Minister | पोलीस दल अधिक मजबूत करण्यावर भर : पालकमंत्री 

पोलीस दल अधिक मजबूत करण्यावर भर : पालकमंत्री 

Next
ठळक मुद्देकपिलनगर, पारडी, वाठोडा पोलीस ठाण्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तांचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे. यासाठी पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
शहरातील उत्तर नागपुरात कपिलनगर, पूर्व नागपुरात पारडी व वाठोडा या तीन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) बी.जी.गायकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) निलेश भरणे, अपर पोलीस आयुक्त, (उत्तर विभाग) शशिकांत महावरकर, पोलीस उपआयक्त निर्मलादेवी, पोलीस उपायुक्त निलोत्पल, पोलीस उपआयुक्त (डीटेक्शन)गजानन राजमाने, पोलीस उपआयुक्त, (मुख्यालय) विक्रम साळी, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, पांडुरंग मेहर, बाल्या बोरकर, नगरसेविका चेतना टांक, पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, पोलिसांना देण्यात येणाऱ्या सुविधा, निवासस्थानांचे बांधकाम, पोलीस ठाण्यांच्या इमारतीची दुरुस्ती व अन्य कारणांसाठी मागील चार वर्षात शासनाने ९०० कोटी रुपये नागपूर पोलिसांना दिले असून आजपर्यंत पोलीस विभागाला एवढा निधी कधीच मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा निधी प्राप्त होऊ शकला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरीपटका पोलीस ठाण्यावर येणारा भार कमी करण्यासाठी कपिलनगर व कळमना पोलीस ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी पारडी आणि वाठोडा अशा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या तीनही पोलीस ठाण्यांना आवश्यक तेवढे पोलीस कर्मचारी देण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत वस्त्यांमधील घरे नियमित करू
शहराला लागून असलेल्या पण एनएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या नागरिकांच्या अनधिकृत घरांचे नियमितीकरण एनएमआरडीएमार्फत करून देण्यात येईल. नागरिकांनी याबद्दल कोणतीही काळजी करू नये. एकही घर अनधिकृत राहणार नाही याची काळजी शासन घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी गोन्हीसिम येथे बोलताना केले.
पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते बहादुरा, खरबी व गोन्हीसिम या तीनही ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

Web Title: Emphasis on strengthening police force: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.