नागपूर विमानतळावर बंगळुरू-पटना विमानाची इमर्जन्सी लँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 06:08 PM2021-11-27T18:08:33+5:302021-11-27T18:09:18+5:30

Nagpur News बंगळुरूवरून पाटणा येथे जात असलेल्या गो -एअरचे विमान शनिवारी आपात्कालीन परिस्थितीत नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले.

Emergency landing of Bangalore-Patna flight at Nagpur Airport | नागपूर विमानतळावर बंगळुरू-पटना विमानाची इमर्जन्सी लँडिंग

नागपूर विमानतळावर बंगळुरू-पटना विमानाची इमर्जन्सी लँडिंग

Next
ठळक मुद्देविमानात होते १३९ प्रवासी

नागपूर : बंगळुरूवरून पाटणा येथे जात असलेल्या गो -एअरचे विमान शनिवारी आपात्कालीन परिस्थितीत नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. या विमानात क्रु मेंबरसह एकूण १३९ प्रवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जी-८८७३ हे विमान बंगळुरू येथून पाटण्याला जात होते. विमानातील इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने विमानातील पायलटने हे विमान नागपूर विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला. या इमरजन्सी लँडिंगची माहिती तातडीने दिली. यानंतर डिझास्टर मॅनेजमेन्ट टीम अलर्ट झाली. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच एटीसीने नागपूर विमानतळाला याची सूचना दिली. विमानतळ व्यवस्थापनाने सुरक्षित लँडिंगसाठी सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली. चार फायर ब्रिगेडच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स उपलब्ध होती.

हे विमान सकाळी ११.२० वाजता नागपूर विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानातील बिघाड दुरुस्त केला जात असून, प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाटण्याला पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.

Web Title: Emergency landing of Bangalore-Patna flight at Nagpur Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.