प्लास्टिक प्रदूषणावर 'इकोब्रिक्स'चा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:09 PM2020-10-21T12:09:26+5:302020-10-21T12:10:14+5:30

Eco Bricks Nagpur News इकोब्रिक्स ही सहज करता येण्याजोगा उपाय आहे. त्याचा उपयोग झाल्यास एकदा उपयोगात येणारे प्लास्टिक किंवा रिसायकल होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकमुळे जमीन किंवा सागराचे प्रदूषण टाळता येईल, हा यामागचा उद्देश आहे.

Ecobricks solution to plastic pollution | प्लास्टिक प्रदूषणावर 'इकोब्रिक्स'चा उपाय

प्लास्टिक प्रदूषणावर 'इकोब्रिक्स'चा उपाय

googlenewsNext
ठळक मुद्दे'पर्यावरण संरक्षण गतिविधी'चा उपक्रम ट्रीगार्ड, उद्यानात होईल उपयोग

अंकिता देशकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक संस्था वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. अशाच प्रकारचा उपाय राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या 'पर्यारवण संरक्षण गतिविधी'द्वारे 'इकोब्रिक्स'च्या माध्यमातून नागपुरात सुरू केला आहे. घरातील प्लास्टिक कचरा प्लास्टिक बॉटलमध्ये भरून गार्डनच्या लहानसहान कामात त्यांचा विटांप्रमाणे उपयोग करण्याचा हा उपाय आहे.
या उपक्रमासाठी काम करणाऱ्या आयाम वेस्ट मॅनेजमेंट संस्थेच्या नॅशनल हेड जुई पांढरीपांडे यांनी इकोब्रिक्सच्या निर्मितीबाबत माहिती दिली. इकोब्रिक्स बनविणे सहज शक्य आहे. प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटलमध्ये घरातील सर्व प्लास्टिकचा कचरा दाबून भरायचा. पूर्णपणे कोंबून घेतल्यावर त्याचे झाकण लावले की इकोब्रिक्स तयार. खरंतर या प्रक्रियेमुळे एक गोष्ट साध्य होते, ती म्हणजे प्लास्टिकचा कचरा घरातील कचऱ्यासोबत सरसकट डम्पिंग यार्डमध्ये पाठविण्याऐवजी प्लास्टिकचे घरातच विलगीकरण होईल. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाचेल. तयार झालेल्या इकोब्रिक्स उद्यानातील ओटे बनविणे, ट्रीगार्ड बनविण्यासोबत टेबल आणि स्टूल बनविण्याच्या कामातही येऊ शकतात. विशेष म्हणजे हरियाणात शौचालयाची भिंत बनविण्यासाठी आणि डेहराडूनमध्ये उद्यानातही त्यांचा यशस्वीपणे वापर करण्याचे आल्याचे जुई यांनी सांगितले.

नागपूरमध्ये व्हॉलेन्टियर्सकडून पहिल्या प्रयत्नात अशाप्रकारच्या ५८ विटा तयार करण्यात आल्या. त्यासाठी २५ किलो पॉलिथीन व प्लास्टिकचा वापर करण्यात आला. यामुळे २५ किलो प्लास्टिक कचरा पर्यावरणात जाण्यापासून वाचला आणि ४०० चौरस मीटर जमीन व जलस्रोताचे संरक्षण झाले. सध्या दीक्षाभूमी चौकातील ब्लाईंड रिलिफ असोसिएशन येथे इकोब्रिक्स कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले आहे. तुम्ही इकोब्रिक्सप्रमाणे उपयोग जरी केला नाही तरी या प्रक्रियेमुळे घरातच प्लास्टिकचे विलगीकरण होईल आणि डम्पिंग यार्डमध्ये प्लास्टिक वेगळे करण्याची डोकेदुखी राहणार नाही, अशी भावना जुई यांनी व्यक्त केली.

इकोब्रिक्स ही सहज करता येण्याजोगा उपाय आहे. त्याचा उपयोग झाल्यास एकदा उपयोगात येणारे प्लास्टिक किंवा रिसायकल होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकमुळे जमीन किंवा सागराचे प्रदूषण टाळता येईल, हा यामागचा उद्देश आहे.
- जुई पांढरीपांडे

Web Title: Ecobricks solution to plastic pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.