कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 06:52 PM2020-04-26T18:52:43+5:302020-04-26T18:53:12+5:30

काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

Do not be hostile to any society | कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका

कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका

Next
ठळक मुद्दे'कोरोना'नंतर विकासाच्या नवीन 'मॉडेल'ची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाशी संपूर्ण देश सामना करत असताना काही भडकविणारे लोक काही समूहात क्रोध व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून अतिवादी कृत्य होत आहेत. मात्र काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. कुठल्याही समाजाचे नाव न घेता त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने त्यांनी रविवारी ऑनलाईन बौद्धिकातून आपली भूमिका मांडली
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शिस्तीचे पालन अत्यावश्यक आहे. देशातील काही भागात शिस्तपालनाची सवयच नसल्याने तेथे अद्याप स्थिती नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाविरोधातील लढ्यात भारताचे काम चांगले होत आहे. शासन व प्रशासनाने तत्परतापूर्वक उपाययोजना लागू केल्या. समाजानेदेखील त्याचे पालन केले. आणखी काही काळ सर्वांनीच सकारात्मकपणे सहकार्य करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भडकविणाऱ्या लोकांच्या बोलण्यात न फसता भय व क्रोध दूर ठेवून एकत्रितपणे कार्य करावे. समाजात सद्भाव व शांतीचे वातवारण बनवावे, असे डॉ. भागवत म्हणाले. संघ स्वयंसेवक व समाजातील दात्यांनी कुठलाही भेदभाव न बाळगता प्रत्येक गरजूला मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

संकटातून संधी शोधा, स्वदेशीवर भर द्या
कोरोनाचे संकट सरल्यानंतर स्थिती बदललेली असेल. अनेक जण ग्रामीण भागात परतले आहेत. त्यांच्या रोजगारासाठीदेखील व्यवस्था करावी लागेल. हे संकट असले तरी यातून संधी शोधण्याची गरज आहे. विकासाचे नवीन मॉडेल शासनाला निर्माण करावे लागेल. विशेष म्हणजे स्वावलंबी होण्यासाठी स्वदेशीवरच भर द्यावा लागेल. त्यामुळे देशातच दर्जेदार उत्पादने तयार व्हावीत, यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. या संकटातून नवीन भारत घडवू शकतो, असे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

पालघरप्रकरणी पोलिसांनी आपले काम करावे
पालघर येथे संतांची झालेली हत्या ही दुर्दैवी बाब आहे. दोघेही संन्यासी धर्माचे आचरण करणारे होते. कायद्याला हातात घेणे कितपत योग्य आहे व पोलिसांनी काय करायला हवे, यावर विचार व्हायला हवा. पोलिसांनी याप्रकरणात आपले काम करावे. २८ तारखेला हिंदू धर्म आचार्य सभेने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आवाहन केले आहे. त्याचे आम्ही पण पालन करू, असे सरसंघचालकांनी सांगितले.

प्रसिद्धीसाठी काम नको
लॉकडाऊन असले तरी संघ स्वयंसेवकांचे समाजात काम सुरू आहे. समाजानेदेखील गरजूंच्या मदतीसाठी तत्परतेने पुढाकार घ्यायला हवा. गरजूंची मदत करत असताना प्रसिद्धीसाठी कुठलेही काम करू नका. समाज व देश आपला आहे, या विचारातून स्वत:च्या आरोग्याचीदेखील काळजी घेऊन काम करा, असे सरसंघचालकांनी सांगितले.

Web Title: Do not be hostile to any society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.