बँकेत खातेदारांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:08 AM2021-04-13T04:08:46+5:302021-04-13T04:08:46+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : खात (ता. माैदा) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी खातेदारांनी साेमवारी (दि. ...

Crowd of bank account holders | बँकेत खातेदारांची गर्दी

बँकेत खातेदारांची गर्दी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : खात (ता. माैदा) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी खातेदारांनी साेमवारी (दि. १२) गर्दी केली हाेती. या ठिकाणी असलेला सुविधांचा अभाव आणि खातेदारांनी उडवलेला काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचा फज्जा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

खात येथील बँक ऑफ इंडियाची शाखा ही परिसरात एकमेव राष्ट्रीयीकृत बँक असल्याने या शाखेत खातेधारकांची संख्याही माेठी आहे. यात शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. दरम्यान, साेमवारी सकाळी ९ वाजतापासून खातेदारांनी बँकेत यायला सुरुवात केली हाेती. हळूहळू खातेदारांची गर्दी आणि उन्हाची तीव्रता वाढत गेली. आत बसायला अथवा उभे राहायला पुरेशी जागा नसल्याने तसेच बाहेर सावलीची काेणतीही सुविधा नसल्याने रांगेत उभे असलेल्या खातेदारांना फिजिकल डिस्टन्सिंगचे भान नव्हते.

अधूनमधून एकमेकांना ढकलाढकली करण्याचे प्रकारही घडले. यात काेण काेराेना संक्रमित आहे आणि काेण नाही, हेही कळायला मार्ग नव्हता. या बँक शाखेत खातेदारांची गर्दी व काेराेना काळात उपाययाेजनांचा फज्जा ही बाब राेज घडत असून, धाेकादायक असली तरी त्यावर कुणीही प्रभावी उपाययाेजना करायला तयार नाही. संभाव्य धाेका टाळण्यासाठी येथे याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Crowd of bank account holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.