Creation Literature Conference Inauguration by Bhimarao Panchale | भीमराव पांचाळे सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटक
भीमराव पांचाळे सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटक

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सृजन साहित्य संघाचे चौथे साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये नागपुरात होत असून, संमेलनाचे उद्घाटन गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते होणार आहे. हे संमेलन रविवारी २४ नोव्हेंबर रोजी मेडिकल चौक, राजाबाक्षा येथील पं. बच्छराज व्यास विद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
सृजन साहित्य संघ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या वतीने आयोजित या संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदींडीने होईल. उद्घाटनानंतर पुस्तक प्रकाशन, श्रवणीय गजल मुशायरा, कविसंमेलन, परिसंवाद आणि इतर कार्यक्रम पार पडतील.

Web Title: Creation Literature Conference Inauguration by Bhimarao Panchale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.