नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतली कोव्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:27 AM2021-02-25T10:27:27+5:302021-02-25T10:28:49+5:30

Nagpur News नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले. यावेळी आयुक्तांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली.

Covacin taken by Nagpur Municipal Commissioner Radhakrishnan b. | नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतली कोव्हॅक्सिन

नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतली कोव्हॅक्सिन

Next
ठळक मुद्देनोंदणी झालेल्यांनी लसीकरणासाठी पुढे यावेमेडिकलमध्ये झाले लसीकरण

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले. यावेळी आयुक्तांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली.

या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, प्रभारी अधिष्ठाता डॉ.आर.पी.सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.

             शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोव्हॅक्सिन व अन्य २० रुग्णालयांमध्ये कोव्हिशिल्ड लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लसीकरणासाठी ज्यांची नोंदणी झालेली आहे, अशा सर्व फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजित दिवशी व ठिकाणी लसीकरण करून घ्यावे. तसेच ज्यांच्या लसीकरणाचा पहिला डोज झालेला आहे त्यांनी २८ दिवसानंतर दुसरा डोज घ्यावा आणि कोरोनाविरुद्धची लढाई जिंकून स्वत:ला व परिवाराला सुरक्षित करून घ्यावे, असे आवाहन राधाकृष्णन बी. यांनी केले. मनपातील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Covacin taken by Nagpur Municipal Commissioner Radhakrishnan b.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.