दारूच्या तस्करीत अडकले नगरसेवकाचे नाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:57 PM2020-05-20T21:57:25+5:302020-05-20T22:00:15+5:30

लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीच्या प्रकरणात अडकलेले दोन आरोपी नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याचे कळल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दोन्ही बाईकस्वार युवकांना अटक केली आहे. त्यांनी ही दारू एका नगरसेवकाच्या सांगण्यावरून ठेवल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पूर्व नागपुरातील नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Corporator's name caught in liquor smuggling! | दारूच्या तस्करीत अडकले नगरसेवकाचे नाव!

दारूच्या तस्करीत अडकले नगरसेवकाचे नाव!

Next
ठळक मुद्देकार्यकर्ते अटकेत : पोलिसांनी दोघांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीच्या प्रकरणात अडकलेले दोन आरोपी नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याचे कळल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दोन्ही बाईकस्वार युवकांना अटक केली आहे. त्यांनी ही दारू एका नगरसेवकाच्या सांगण्यावरून ठेवल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पूर्व नागपुरातील नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी सायंकाळी लकडगंज पोलिसांना जुना बगडगंजच्या प्लॉट क्रमांक ५२९ जवळ दारूचा साठा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तेथे धाड टाकली. तेथे पोलिसांना देवानंद श्यामराव लाकडे (३६) आणि प्रशांत रमेश किरपाने (३०) हे दोघे सापडले. त्यांच्याकडून बाईकसह ४५ हजाराची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांची गर्दी जमा झाली. नागरिकांनी ही दारू एका नगरसेवकाची असल्याचे सांगितले. त्यांनी नगरसेवकाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. कारवाईची माहिती मिळताच नगरसेवकाचे समर्थक नेते तेथे पोहोचले. त्यांनी लकडगंज पोलिसांशी चर्चा केली. तासाभराच्या चर्चेनंतर नेत्यांना यश आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी नगरसेवकाला वाचविल्याची चर्चा पसरली. याबाबत ‘लोकमत’ने लकडगंज पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिकाऱ्यांचा दाखला देत माहिती देण्यास नकार दिला. पोलीस माहिती केंद्राने या बाबीची पुष्टी करत दोन आरोपींना अटक क रण्यात आल्याचे सांगितले. या कारवाईमुळे पूर्व नागपुरातील नेते आणि कार्यकर्त्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Corporator's name caught in liquor smuggling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.