Coronavirus : आता संशयित रुग्णांचे नमुने घरी जाऊनच घेणार  : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 08:57 PM2020-03-14T20:57:06+5:302020-03-14T20:58:05+5:30

आता कोराना संशयित रुग्णांचे त्यांच्या घरीच विलगीकरण (होम क्वॉरेंटाईन) करण्यात येणार आहे. अशा रुग्णांनी नियंत्रण कक्षाला फोन केला, तर आमची तज्ज्ञ प्रशासनाची चमू त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘स्वॅप’ (नमुने) घेऊन येतील.

Coronavirus: Will take home samples of suspected patients now: Collector Ravindra Thakare | Coronavirus : आता संशयित रुग्णांचे नमुने घरी जाऊनच घेणार  : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

Coronavirus : आता संशयित रुग्णांचे नमुने घरी जाऊनच घेणार  : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देसंशयित रुग्णांचे घरीच विलगीकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आता कोराना संशयित रुग्णांचे त्यांच्या घरीच विलगीकरण (होम क्वॉरेंटाईन) करण्यात येणार आहे. अशा रुग्णांनी नियंत्रण कक्षाला फोन केला, तर आमची तज्ज्ञ प्रशासनाची चमू त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘स्वॅप’ (नमुने) घेऊन येतील. तेव्हापर्यंत त्यांनी घरीच एका वेगळ्या स्वतंत्र खोलीत स्वत:ला १४ दिवस इतरांपासून ठेवून घ्यावे. दरम्यान, यापैकी ज्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले त्यांना रुग्णालयात हलवले जाईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.
सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून येत असतील तर त्या व्यक्तीने घरातच स्वत:ला १४ दिवस इतरांपासून दूर ठेवण्याची गरज आहे. कोरोनाची लक्षणे वाटल्यास जिल्हा प्रशासनाच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधावा. हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही. डॉक्टरांचा सहभाग असलेली तज्ज्ञ प्रशासनाची चमूच तुमच्या घरी येईल. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांवर नागपुरातील मेयो व मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांत वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आलेले आहे. त्यांना रुग्णालयात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोयी पुरविण्यात येत आहेत, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.
मेयोतील त्या चारपैकी तीन संशयित रुग्ण परतले
रुग्णालयात दाखल होऊन परत गेलेल्या संशयित रुग्णांशी संपर्क झाला असून, त्यापैकी तिघेजण रुग्णालयात परतले आहेत. यापैकी उर्वरित एकजण परत येत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. नागपुरातील मेयो रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले हे ४ संशयित शासकीय मेयो रुग्णालयात दाखल होते. या चारही संशयितांचा अहवाल आज शनिवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत येणार होता. त्यापूर्वीच हे चारही जण काल मध्यरात्री रुग्णालयातून घरी परत गेले होते. तिघांपैकी एकाच्या लहान मुलीला ताप होता. त्यामुळे तो रुग्णालयात थांबू शकत नव्हता, असे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.
पोलीस यंत्रणेची मदत घेणार
मेयो आणि मेडिकलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल रात्रीसारखा प्रकार पुन्हा घडू नये, याची जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्ण खबरदारी घेत आहे. रात्री घरी परत जाणाऱ्या संशयित रुग्णांना डॉक्टर व परिचारिकांनी थांबण्याची विनंती केली. मात्र रुग्ण घरी निघून गेले. जिल्हा प्रशासनाला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता पोलीस तैनात करणार असल्याचे सांगून, पोलीस यंत्रणेचीही मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Coronavirus: Will take home samples of suspected patients now: Collector Ravindra Thakare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.