CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना चाचण्यांचा विक्रम  : ४५२ नव्या रुग्णांची भर : ८ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 10:06 PM2020-11-26T22:06:37+5:302020-11-26T22:08:10+5:30

CoronaVirus, Record of corona tests , nagpur news

CoronaVirus in Nagpur: Record of corona tests in Nagpur: 452 new patients added: 8 patients die | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना चाचण्यांचा विक्रम  : ४५२ नव्या रुग्णांची भर : ८ रुग्णांचा मृत्यू

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना चाचण्यांचा विक्रम  : ४५२ नव्या रुग्णांची भर : ८ रुग्णांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनऊ हजारावर चाचण्या

 

 

 

नागपूर : सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचे अनेक नवे विक्रम स्थापित झाले होते. आता चाचण्यांचे विक्रम होऊ घातले आहे. गुरुवारी ९११६ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. मागील तीन महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. यातून ४५२ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ११०३३२ झाली असून ८ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३६२८ वर पोहचली आहे.

दिवाळी होऊन १० दिवसाचा कालावधी लोटला आहे. परंतु रुग्णांची संख्या ५०० च्या खाली आहे. आरोग्य यंत्रणेसाठी काहीशी समाधानकारक बाब आहे. विशेष म्हणजे, दिवाळीनंतर एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची संख्या ४८५ होती. गुरुवारी दुसऱ्यांदा ४५० रुग्णसंख्येचा आकडा ओलांडला. सप्टेंबर महिन्यात एका दिवसातील ९९०० चाचण्यांची नोंद होती. त्यानंतर पहिल्यांदाच नऊ हजार चाचण्यांचा टप्पा ओलांडण्यात आला. आज झालेल्या चाचण्यांमध्ये रॅपिड अँटिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्या सर्वाधिक झाल्या. ग्रामीण व शहर मिळून ७५६२ रुग्णांचा आरटीपीसीर चाचण्यांमध्ये ४१७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर, १५५४ रुग्णांच्या अँटिजेन चाचण्यांमध्ये ३५ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. एम्सच्या प्रयोगशाळेने ७७१, मेडिकलच्या प्रयोगशाळेने ९०१, मेयोच्या प्रयोगशाळेने १३८४, माफसूच्या प्रयोगशाळेने १२४, नीरीच्या प्रयोगशाळेने १६४, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने २३३, खासगी लॅबमध्ये ३९०३ रुग्णांच्या तपासण्या केल्या.

-अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोनाचे क्रियाशिल म्हणजे ‘अ‍ॅक्टीव्ह’ रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवाळीपूर्वी हजाराखाली गेलेली ही रुग्णसंख्या मंगळवारी १५४३ वर पोहचली. शिवाय, ३२७२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. एकूण ४८१५ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. आज १५० रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण कमी होऊन ९२ टक्क्यांवर आले आहे. आतापर्यंत १०१८८९ रुग्ण बरे झाले आहेत.

 

::कोरोनाची आजची स्थिती

-दैनिक संशयित : ९११६

-बाधित रुग्ण : ११०३३२

_-बरे झालेले : १०१८८९

- उपचार घेत असलेले रुग्ण : ४८१५

- मृत्यू : ३६२८

Web Title: CoronaVirus in Nagpur: Record of corona tests in Nagpur: 452 new patients added: 8 patients die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.