CoronaVirus in Nagpur : शहरात एक, ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 09:46 PM2021-06-17T21:46:46+5:302021-06-17T21:47:11+5:30

CoronaVirus, Nagpur news कोरोनाचे संकट आटोक्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून दैनंदिन मृत्यूची संख्या दहाच्या आत असून हळूहळू कमी होत आहे. गुरुवारी ही संख्या दोनवर आली. यात शहरातील एक तर जिल्हाबाहेरील एक तर ग्रामीणमध्ये सलग पाचव्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद झाली.

CoronaVirus in Nagpur: One in urban, zero deaths in rural | CoronaVirus in Nagpur : शहरात एक, ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू

CoronaVirus in Nagpur : शहरात एक, ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू

Next
ठळक मुद्दे७४ रुग्णांची नोंद : कोरोनाचे संकट आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे संकट आटोक्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून दैनंदिन मृत्यूची संख्या दहाच्या आत असून हळूहळू कमी होत आहे. गुरुवारी ही संख्या दोनवर आली. यात शहरातील एक तर जिल्हाबाहेरील एक तर ग्रामीणमध्ये सलग पाचव्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद झाली. आज जिल्ह्यात ७४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ०.९० टक्क्यांवर आला आहे.

नागपूर जिल्ह्यात गुरुवारी ११७६ चाचण्या झाल्या. यात शहरात ६२०५ चाचण्यातून ४३ रुग्ण तर, ग्रामीणमध्ये झालेल्या १९९६ चाचण्यातून ३० रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. मागील सहा दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ७५ ते ८५ दरम्यान राहत आहे. परंतु सध्या वाढलेला पावसाचा जोर व सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी पाहता रुग्णसंख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. आज २३२ रुग्ण बरे झाले असून कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ९७.८६ टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत ४,६६,४६० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाचे ११७६ रुग्ण उपचार घेत असून यातील ३०५ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये तर ८७१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

मेडिकलमधील १०,५९१, मेयोमधील १०,५१५ रुग्ण बरे

कोरोनाच्या या १५ महिन्याच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) १०, ५९१ तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १०,५१५ रुग्ण बरे झाले आहेत. या शिवाय, ‘एम्स’मधील २३०९, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून १०८७, आयसोलेशन हॉस्पिटलमधून २७०, आयुष हॉस्पिटलमधून २२०, पाचपावली डीसीएचसी सेंटरमधून ५२७, पाचपावली महिला रुग्णालयातून ९, केटीनगर हॉस्पिटलमधून ५७, लता मंगेशकर हॉस्पिटलमधून २३४४, शालिनीताई मेघे रुग्णालयातून २६२८, लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी येथून ३६४ तर रेल्वे हॉस्पिटलमधून १५७ रुग्ण बरे झाले आहेत.

 कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ८२०१

शहर : ४२ रुग्ण व १ मृत्यू

ग्रामीण :३० रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७६,६५१

ए. सक्रिय रुग्ण : ११७६

ए. बरे झालेले रुग्ण : ४,६६,४६०

ए. मृत्यू : ९०१५

Web Title: CoronaVirus in Nagpur: One in urban, zero deaths in rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.