CoronaVirus in Nagpur : चार महिन्यातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा उच्चांक : ७१० पॉझिटिव्ह, ८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 10:04 PM2021-02-22T22:04:18+5:302021-02-22T22:06:41+5:30

कोरोनाबाधितांसोबतच सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सोमवारी हा आकडा वाढून ६२६२वर गेला. मागील चार महिन्यातील हा उच्चांक आहे.

CoronaVirus in Nagpur: Four-month corona inactive patients peak: 710 positive, 8 deaths | CoronaVirus in Nagpur : चार महिन्यातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा उच्चांक : ७१० पॉझिटिव्ह, ८ मृत्यू

CoronaVirus in Nagpur : चार महिन्यातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा उच्चांक : ७१० पॉझिटिव्ह, ८ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे६२६२ सक्रिय रुग्ण : चाचण्यांची संख्याही ९ हजारापुढे

लोकमत  न्यूज  नेटवर्क   

नागपूर : कोरोनाबाधितांसोबतच सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सोमवारी हा आकडा वाढून ६२६२वर गेला. मागील चार महिन्यातील हा उच्चांक आहे. शिवाय, सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच आज ९७५२ संशयित रुग्णांच्या चाचणीनेही नवा विक्रम गाठला. परिणामी, आज बाधितांची संख्या वाढून ७१० झाली. विशेष म्हणजे, या वर्षात मागील चार दिवसांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. २८१६ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १४३८४३ झाली असून ८ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४२८३वर गेली.

नागपूर जिल्ह्यात या महिन्यात दुसºयांदा चाचण्यांची संख्या ९ हजारावर गेली. यापूर्वी २० फेब्रुवारी रोजी ९४४३ चाचण्या झाल्या होत्या. दोन्हीवेळी बाधितांच्या संख्येने ७०० चा टप्पा ओलांडला. आज झालेल्या चाचण्यांमध्ये ६२४९ आरटीपीसीआर तर ३५०३ रॅपीड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीारमधून ६६३ तर अँटिजेनमधून ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्सच्या प्रयोगशाळेतून ५६, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ६२, मेयोच्या प्रयोगशाळेतून ९७, नीरीच्या प्रयोगशाळेतून ४०, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून १०० तर खासगी लॅबमधून ३०८ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत एकूण ११७६२०९ चाचण्या झाल्या.

शहरात ६४१ तर ग्रामीणमध्ये ६७ नवे रुग्ण

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ६४१, ग्रामीणमधील ६७ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील २ तर जिल्हाबाहेरील २ मृत्यू आहे. शहरात रुग्णांची एकूणसंख्या ११४८६९ व मृतांची संख्या २७७१, ग्रामीणमध्ये २८०४६ व मृतांची संख्या ७६६ तर जिल्हाबाहेर ९२८ व मृतांची संख्या ७४६ झाली आहे. आज कोरोनाचा प्रादूर्भावातून ४३७ रुग्ण बरे झाले आहेत.

असे वाढले सक्रिय रुग्ण

ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच २० डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ६१३० झाली होती. त्यानंतर आज बाधितांची संख्या ६२६२वर गेली आहे. विशेष म्हणजे, ११ फेब्रुवारी ३५४७, १२ फेब्रुवारी रोजी ३६३४, १३ फेब्रुवारी रोजी ३८४९, १४ फेब्रुवारी रोजी ४०४७, १५ फेब्रुवारी रोजी ४२६१, १६ फेब्रुवारी रोजी ४४०५, १७ फेब्रुवारी रोजी ५१०५, १८ फेब्रुवारी रोजी ५६१७, २० फेब्रुवारी रोजी ५८३४ तर २१ फेब्रुवारी रोजी ५९९७ झाली. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येने शासकीयसह खासगी रुग्णालयातील खाटाही फुल्ल होऊ लागल्या आहेत.

दैनिक चाचण्या : ९७५२

बाधित रुग्ण : १४३८४३

बरे झालेले : १३३२९८

उपचार घेत असलेले रुग्ण : ६२६२

 मृत्यू : ४२८३

Web Title: CoronaVirus in Nagpur: Four-month corona inactive patients peak: 710 positive, 8 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.