CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५१ मृत्यू, १,२९१ नवीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:40 AM2020-09-24T00:40:55+5:302020-09-24T00:41:59+5:30

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान कायम आहे. बुधवारी ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात शहरातील ३६, ग्रामीणमधील ७ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत. तर १,२९१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील ९४५, ग्रामीणमधील ३३८ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत.

Coronavirus in Nagpur: 51 deaths, 1,291 new positive in Nagpur | CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५१ मृत्यू, १,२९१ नवीन पॉझिटिव्ह

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५१ मृत्यू, १,२९१ नवीन पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देशहरात ९४५, ग्रामीणमधील ३३८ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान कायम आहे. बुधवारी ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात शहरातील ३६, ग्रामीणमधील ७ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत. तर १,२९१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील ९४५, ग्रामीणमधील ३३८ आणि जिल्ह्याबाहेरचे ८ जण आहेत.
आतापर्यंत एकूण ६७,६७१ पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. यात शहरातील ५३,५६८, ग्रामीणमधील १३,७१६, जिल्ह्याबाहेरचे ३८७ आहेत. आतापर्यंत एकूण २,२०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील १,६३९, ग्रामीणमधील ३६१ आणि जिल्ह्याबाहेरचे २०५ जण आहेत. बुधवारी नागपुरात ४,७७६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ३,४१८, ग्रामीणमधील १,३५८ आहेत. आतापर्यंत एकूण ४ लाख ११ हजार ८६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत नागपुरातील एकूण ५१,९१२ पाॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. यात ३२,२९२ होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे.

खासगीमध्ये ३६६ नमुने पॉझिटिव्ह
खाासगी प्रयोगशाळेत तपासण्यात येत असलेले नमुने पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या २४ तासात १,२१८ नमुने तपासण्यात आले. यापैकी ३६६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ३,०७९ नमुन्यांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी ३२१ नमुने पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत ८५, मेडिकलमध्ये २००, मेयामध्ये १७५, माफसूमध्ये ७० आणि नीरीच्या प्रयोगशाळेत ७७४ नमुने पॉझिटिव्ह आले.

अ‍ॅक्टिव्ह - १३,५५४
बरे झालेले - ५१,९१२
मृत - २,२०५

Web Title: Coronavirus in Nagpur: 51 deaths, 1,291 new positive in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.