CoronaVirus in Nagpur : कोविड प्रादुर्भावाचे १०० दिवस पूर्ण : ६५ पॉझिटिव्ह , एकूण रुग्ण संख्या १२७०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:35 PM2020-06-20T23:35:00+5:302020-06-20T23:37:06+5:30

कोविड प्रादुर्भावाला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. ११ मार्चपासून सुरू झालेल्या या संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २० दिवसात आढळून आले. ७३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शनिवारी नोंद झालेल्या ६५ रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या आता १२७०वर पोहचली आहे.

CoronaVirus in Nagpur: 100 days of covid incubation completed: 65 positive, total number of patients 1270 | CoronaVirus in Nagpur : कोविड प्रादुर्भावाचे १०० दिवस पूर्ण : ६५ पॉझिटिव्ह , एकूण रुग्ण संख्या १२७०

CoronaVirus in Nagpur : कोविड प्रादुर्भावाचे १०० दिवस पूर्ण : ६५ पॉझिटिव्ह , एकूण रुग्ण संख्या १२७०

Next
ठळक मुद्देगेल्या २० दिवसात ७३१ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड प्रादुर्भावाला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. ११ मार्चपासून सुरू झालेल्या या संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २० दिवसात आढळून आले. ७३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शनिवारी नोंद झालेल्या ६५ रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या आता १२७०वर पोहचली आहे. रुग्णसंख्येचा हा वाढता आकडा आरोग्य यंत्रणेसाठी चिंता वाढविणारा असला तरी बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या समाधानकारक आहे. ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत शुक्रवारी रात्री व शनिवारी असे मिळून ३१रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन होते. यातील बहुसंख्य रुग्ण हे नाईक तलाव-बांगलादेश, लष्करीबाग, काटोल चौक येथील आहेत. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन होते. मेयोच्या प्रयोगशाळेतून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण मेयो येथेच भरती आहे. खासगी प्रयोगशाळेतन सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील तीन गणेशपेठ, एक रामदासपेठ, तर एक मोमीनपुरा येथील आहे. कळमेश्वर येथील एका रुग्णाचे नमुने मुंबईच्या खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले. नीरीच्या प्रयोगशाळेतून २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण पाचपावली क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होते. आज एकूण ६५ रुग्णांची भर पडली.

मार्च महिन्यात होते केवळ १६रुग्ण
मार्च महिन्यात कोरोनाचे केवळ १६ रुग्ण होते. एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या वाढून १३८ वर पोहचली तर मे महिन्यात रुग्णांची संख्या ५४० होती. परंतु २० जूनपर्यंत या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होऊन बाधितांची संख्या १२७० वर पोहचली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात नोंद झालेल्या तीन रुग्णांची साखळी संपुष्टात आणण्यास आरोग्य यंत्रणेला यश आले होते. मात्र, नंतर सतरंजीपुरा, मोमीनपुरा, टिमकी, भानखेडा, नाईक तलाव-बांगलादेश, लष्करीबाग तर आता चंद्रमणीनगरसह विविध नव्या वसाहतीतून रुग्ण आढळून येत आहे.

२० रुग्णांना डिस्चार्ज
एम्समधून ५ तर मेडिकलमधून १५ असे एकूण २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. एम्समधून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्व नाईक तलाव-बांगलादेश येथील आहेत. मेडिकलमधून सुटी झालेल्यांमध्येही सर्वाधिक रुग्ण याच वसाहतीतील आहेत. आतापर्यंत डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ८३८ झाली आहे.

दैनिक संशयित २४२
दैनिक तपासणी नमुने ६६२
दैनिक निगेटिव्ह नमुने ६०४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२७०
नागपुरातील मृत्यू १८
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ८३८
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३७६५
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २६६८
पीडित- १२७०-दुरुस्त-८३८-मृत्यू-१८

Web Title: CoronaVirus in Nagpur: 100 days of covid incubation completed: 65 positive, total number of patients 1270

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.