कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 09:08 AM2020-04-11T09:08:15+5:302020-04-11T09:09:45+5:30

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे.

Corona's lockdown; Silent in the village, crowd in the city ! | कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा!

कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा!

Next
ठळक मुद्देगावकरी जपत आहेत ‘सोशल डिस्टन्सिंग’शेतीच्या कामाचेही सुयोग्य नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. त्याउलट शहरात मुजोर घटकांकडून कायद्याला आणि सामाजिक जबाबदारीला हरताळ फासण्यात येत आहे.
जगभरात दरदिवसाला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि मृतांची संख्याही दरदिवस दुपटीने वाढत असल्याचे दृश्य आहे. भारतातही कोरोनाने पाय पसरले असून, त्याअनुषंगाने केंद्र व राज्य सरकारांनी संकटपूर्व पाऊल उचलले आहे. त्याला सर्वस्तरातून उत्तम प्रतिसादही लाभत आहे. डॉक्टर, पोलीस, सैनिक, स्वच्छता दूत, पत्रकार मंडळी अशा संकटाच्या परिस्थितीतही संयमाने आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. पण काही रिकामटेकडे आणि धर्मांध लोकांना कोरोनाच्या संसर्गाची मुळीच धास्ती दिसत नसल्याने, शहरात पोलिसांना त्यांच्यामागे बरीच धावपळ करावी लागत आहे. मात्र, त्याउलट गावांत प्रचंड शांतता दिसून येत आहे. शहराच्या शेजारच्या भागातील गावांमध्ये फेरफटका मारला असता गावकरी कायद्याचे मन:पूर्वक पालन करत आहे. एप्रिल हा महिना पाऊसपूर्व कामांच्या लगबगीचा असतो. त्यामुळे, वखरणी, पराटी उपटणे आदी कामे या काळात मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेला लॉकडाऊन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे गावकरी मानत असल्याचे दिसून येते. सुराबर्डी, वडधामना, गोंडखैरी, काटोल मार्गावरील ब्राह्मणवाडा या भागात नागरिक आपली शेतीविषयक कामे वगळता दिवसभर सोशल डिस्टन्सिंग जपत आहेत. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ६ अशी दिवसाला मोजून चार तास शेतीची कामे केली जात असून, शेतमजूरांना लागलीच सोडले जात आहे. शिवाय, ही कामे करताना मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. बाकीचा वेळ घरी आराम करणे आणि टीव्हीवर कोरोनाबाबतच्या बातम्यांचा आढावा घेण्यावर वेळ जात असल्याचे चित्र आहे.


जनावरांना मोकळे सोडता येत नाही! - गिरीधर शेडामे
: आम्ही सगळे गावकरी लॉकडाऊन पाळत आहोत. घराच्या बाहेर कुणी निघतही नाही. दिवसभर टीव्ही आणि कोरोनाच्या बातम्या यातच वेळ घालवतो आहोत. सकाळी व संध्याकाळी मात्र शेतीची कामे करावी लागतात. पिकांची कापणी आणि विक्री झाल्यावर पावसाळ्यापूर्वीची सगळी कामे उरकली जात आहेत. जनावरांकडे लक्ष पुरवावे लागते. त्यांचा चारा, पाणी करून परतावे लागत आहेत. वेळेअभावी अनेक कामेही रखडली आहेत. पण, सुरक्षा महत्त्वाची असल्याची भावना खडगाव, सावली येथील शेतकरी गिरीशर शेडामे यांनी व्यक्त केली.


आम्ही गावकरी खंबीर! - लीलाधर डेहनकर
: आम्ही गावकरी अगदी खंबीर आहोत. एका गावचा माणूस दुसºया गावी जात नाही किंवा येऊही दिल्या जात नाही. दुकाने, गाव पूर्णपणे बंद आहे. सध्या शेतात वखरणी व पराटी काढणे सुरू आहे. जूनच्या आधी हे काढणे गरजेचे आहे म्हणून शेतात सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास मजुरांसोबत काम करावे लागत आहे. काम करतानाही डिस्टन्सिंग पाळले जात असल्याचे माहुरझरी जवळील ब्राह्मणवाडा येथील शेतकरी लीलाधर डेहनकर यांनी सांगितले.
 

 

Web Title: Corona's lockdown; Silent in the village, crowd in the city !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.