CoronaVirus in Nagpur :  कोरोनाचे केवळ चारच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:50 PM2020-10-23T22:50:54+5:302020-10-23T22:53:05+5:30

Only four deaths of Corona, Nagpur Newsकोरोनाची स्थिती नागपूर जिल्ह्यात नियंत्रणात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चाचण्यांची संख्या ५००० ते ६०००च्या दरम्यान असूनही कमी रुग्ण सापडत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णवाढीचा आलेख असाच राहिल्यास साथ आटोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी शहरात केवळ चार तर ग्रामीणमध्ये तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

Corona Virus in Nagpur: Only four deaths of Corona | CoronaVirus in Nagpur :  कोरोनाचे केवळ चारच मृत्यू

CoronaVirus in Nagpur :  कोरोनाचे केवळ चारच मृत्यू

Next
ठळक मुद्देमृत्यूदर कमी : ४६५ नव्या रुग्णांची भर : ६८३ रुग्णांना डिस्चार्ज

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाची स्थिती नागपूर जिल्ह्यात नियंत्रणात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चाचण्यांची संख्या ५००० ते ६०००च्या दरम्यान असूनही कमी रुग्ण सापडत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णवाढीचा आलेख असाच राहिल्यास साथ आटोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी शहरात केवळ चार तर ग्रामीणमध्ये तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दैनंदिन मृत्यूच्या संख्येतील ही सर्वात कमी मृत्यू आहे. जिल्ह्याबाहेरील सहा रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १३ झाली आहे. ४६५ नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ९३,०५५ तर मृतांची संख्या ३,०२७ वर गेली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या घटू लागली आहे. ८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत रुग्णसंख्या ४५० ते ६०० या दरम्यान दिसून आली. सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. ८ ऑक्टोबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ९,४८९ इतकी होती, २२ ऑक्टोबर रोजी ही संख्या ५,४९३ इतकी कमी झाली. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढून ८३,६३३वर गेली आहे. पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर आला आहे. मृत्यूचा दरही २.९१ टक्क्यांवरून २.८६ टक्क्यांवर आला आहे.

माफसूच्या प्रयोगशाळेत शून्य तर एम्समध्ये केवळ पाच बाधित

नागपूर जिल्ह्यात आज आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन मिळून ६,५३६ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ॲन्टिजेन चाचण्यातून २१२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, माफसूच्या प्रयोगशाळेत ११६ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. एम्सच्या प्रयोगशाळेत १४२ रुग्णांच्या चाचण्या केल्या असता केवळ पाच रुग्ण बाधित आढळून आले. मेडिकलमध्ये ४२३ चाचण्यांमधून ५१, मेयोमध्ये १०११ चाचण्यांमधून ४९, नीरीमध्ये ८७ चाचण्यांमधून ३४, नागपूर विद्यापीठमध्ये १७८ चाचण्यांमधून पाच तर खासगी लॅबमध्ये ११७३४ चाचण्यांमधून १०९ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित : ६३५६

बाधित रुग्ण : ९३०५५

बरे झालेले : ८४३१६

उपचार घेत असलेले रुग्ण : ५७१२

 मृत्यू : ३०२७

Web Title: Corona Virus in Nagpur: Only four deaths of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.