CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:27 PM2020-09-21T23:27:34+5:302020-09-21T23:28:47+5:30

वाढत्या कोरोना संक्रमणाने जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात धडकी भरवली होती. परंतु, गेल्या दोन दिवसापासून कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

Corona Virus in Nagpur: More corona free than infected in Nagpur for two days | CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

Next
ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८२.२५ टक्के

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : वाढत्या कोरोना संक्रमणाने जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात धडकी भरवली होती. परंतु, गेल्या दोन दिवसापासून कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी १,९९४ रुग्णांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले तर, १,३५० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. रविवारी १,६१० रुग्ण बरे झाले होते तर, १,२२६ नवीन रुग्ण मिळाले होते.
जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८२.२५ टक्के झाले आहे. जूनच्या शेवटपर्यंत हे प्रमाण ८२ टक्क्यांच्या घरात पोहचले होते. परंतु, त्यानंतर कोरोना संक्रमण वेगात वाढले व त्यासोबत रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण कमी झाले होते. सप्टेंबरमध्ये कोरोनामुक्तीची टक्केवारी पुन्हा वाढल्यामुळे समाजात दिलासादायक संकेत गेले आहेत. सोमवारी शहरातील १,७१७ तर, ग्रामीणमधील २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण ५३ हजार ५५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात शहरातील ४४ हजार १५ तर, ग्रामीणमधील ९ हजार ५३५ रुग्णांचा समावेश आहे. तसेच, अस्तित्वातील कोरोना रुग्णांची संख्या दीर्घ काळानंतर १० हजाराच्या खाली आहे. सोमवारी ९ हजार ४६३ (शहर-५,७६५, ग्रामीण-३,६९८) कोरोना रुग्ण अस्तित्वात होते. त्यातील ४ हजार २७९ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.  

४८ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यामध्ये सोमवारी १,३५० (शहर-१,०२३, ग्रामीण-३२२, इतर-५) नवीन कोरोना रुग्ण आढळून आले तर, ४८ (शहर-३५, ग्रामीण-८, इतर-५) कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण २,०९४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६५ हजार १०७ झाली आहे.  

३,८८८ नमुन्यांची चाचणी
सोमवारी जिल्ह्यामधील ३,८८८ (शहर-२,७७२, ग्रामीण-१,११६) नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या १,०२७ पैकी ४०५ नमुने पॉझिटिव्ह आढळले. तसेच, एम्समध्ये ८७, मेडिकलमध्ये १६४, मेयोमध्ये ९८ तर, नीरीमध्ये १३९ नमुने पॉझिटिव्ह आले. १,४९५ नमुन्यांची अ‍ॅन्टिजेन चाचणी झाली. त्यातील ४५७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. नमुन्यांची संख्या कमी झाल्याने सिव्हिल सर्जन डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आठवड्याच्या शेवटी नमुन्यांची तपासणी कमी होत असल्याची माहिती दिली.  मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून याविषयी माहिती मिळू शकली नाही.  

अ‍ॅक्टिव्ह - ९,४६३
स्वस्थ - ५३,५५०
मृत्यू - २०९४

Web Title: Corona Virus in Nagpur: More corona free than infected in Nagpur for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.