CoronaVirus in Nagpur : नागपुरात उच्चांक, तब्बल ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह,नऊ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:13 PM2020-07-30T23:13:14+5:302020-07-30T23:14:32+5:30

वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले शिवाय, नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

Corona Virus in Nagpur: High in Nagpur, 342 patients tested positive, nine patients die | CoronaVirus in Nagpur : नागपुरात उच्चांक, तब्बल ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह,नऊ रुग्णांचा मृत्यू

CoronaVirus in Nagpur : नागपुरात उच्चांक, तब्बल ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह,नऊ रुग्णांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देशहरात १८२ तर ग्रामीणमध्ये १६० बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले शिवाय, नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ५१३४ वर पोहचली असून मृतांची संख्या ११८ झाली आहे. आज नोंद झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १८२ रुग्ण शहरातील तर १६० रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, २२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.
कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. गेल्या चार दिवसात हजार नव्या रुग्णांची तर ४० मृत्यूची भर पडली. हे धोक्याचे संकेत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. घराबोहर पडताना विशेष काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयात (मेयो) तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात ५० वर्षीय अनोळखी पुरुषाला पोलिसांनी गंभीर अवस्थेत २९ जुलै रोजी दाखल केले. उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. कामठी येथील ३५ वर्षीय पुरुषाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. न्यू येरखेडा येथील ६५ वर्षीय पुरुषाला गंभीर अवस्थेत २६ जुलै रोजी मेयोत दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला. या तिन्ही रुग्णाला निमोनिआ व श्वसनाचा विकार होता. उर्वरीत सहा रुग्णांच्या मृत्यूची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून उपलब्ध होऊ शकली नाही. आतापर्यंतच्या एकूण मृतांमध्ये ग्रामीण भागातील १८, शहरातील ७१ तर जिल्ह्याबाहेरील २९ आहेत.

मेयोच्या प्रयोगशाळेतून ९६ बाधित
मेयोच्या प्रयोगशाळेतून सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आले. ९६ बाधितांची नोंद झाली. मेडिकलमधून ६४, एम्समधून ६३, नीरीच्या प्रयोगशाळेमधून ३७, माफसूमधून ८, खासगी लॅबमधून ६२, अ‍ॅन्टिजन चाचणीतून १२ असे एकूण ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये किंवा होम आयसोलेशन केले जात असलेतरी मेयो, मेडिकलमध्ये ३०० वर रुग्ण उपचार घेत आहेत.

या वसाहतीतून पॉझिटिव्ह रुग्ण आले
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांमध्ये चांभार मोहल्ला १, शताब्दी चौक १, सीताबर्डी २, नारी ३, सीए रोड ४, हुडकेश्वर २, मानेवाडा २, जीएमसी मेडिकल ९, गणेशपेठ १, सदर २, गोळीबार चौक २, वर्धमाननगर ९, दिघोरी ४, मंगळवारी बाजार १२, अवस्थीनगर मानकापूर १, चंद्रनगर १, लकडगंज १, टेकडी वाडी ९, बोरगाव १, वाठोडा १, घाटरोड १, गांधीबाग १, रानू कॉन्व्हेंट शाळेजवळ १, न्यू बाभूळखेडा १, म्हाळगीनगर २, पाचपावली ४, दुर्गानगर १, पिवळी नदी परिसर ३, सोमलवाडा १, नंदनवन ४, सुरेंद्रनगर १, धंतोली १, मोहननगर १, जरीपटका ३, हसनबाग १, गिट्टीखदान १, इंदोरा २, महाल ५, इतवारी ३, रामदासपेठ १, हनुमाननगर २, गड्डीगोदाम २, धरमपेठ ३, सेमिनरी हिल्स १, रेशीमबाग ३, गंगाबाई घाट रोड १, पारडी १, टेकानाका १, नरसाळा रोड १, खरबी रोड १, भांडे प्लॉट १, देशपांडे ले-आऊट १, गणेश टेकडी परिसर १ असे एकूण १२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

दैनिक संशयित :१८६
बाधित रुग्ण : ५१३४
बरे झालेले : ३२९४
उपचार घेत असलेले रुग्ण : १७२२
मृत्यू : ११८

Web Title: Corona Virus in Nagpur: High in Nagpur, 342 patients tested positive, nine patients die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.