CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:56 PM2020-08-13T23:56:04+5:302020-08-13T23:57:35+5:30

कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारावर गेल्याने धाकधुक वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या ५००वर आहे. गुरुवारी पुन्हा ७२७ नव्या रुग्णांची भर पडली. यात ग्रामीणमधील ९२ तर शहरातील ६६५ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ११,७०९ झाली आहे. आज १८ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या ४२० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, ३१ मे रोजी बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण ७१.४८ टक्के होते, आता ते ४७.११ टक्क्यांवर आले आहे.

Corona Virus in Nagpur: Corona Virus free Rate in Nagpur is 47% | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४७ टक्के

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४७ टक्के

Next
ठळक मुद्दे७२७ रुग्ण पॉझिटिव्ह, १८ रुग्णांचा मृत्यू : ग्रामीणमधील ९२ तर शहरातील ६६५ रुग्ण बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारावर गेल्याने धाकधुक वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या ५००वर आहे. गुरुवारी पुन्हा ७२७ नव्या रुग्णांची भर पडली. यात ग्रामीणमधील ९२ तर शहरातील ६६५ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ११,७०९ झाली आहे. आज १८ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या ४२० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, ३१ मे रोजी बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण ७१.४८ टक्के होते, आता ते ४७.११ टक्क्यांवर आले आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मेयोमध्ये आठ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचे वय ४० ते ७० दरम्यान होते. यातील बहुसंख्य रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचा विकार होता. मृतांमध्ये हिवरीनगर येथील ६२ वर्षीय महिला, सदर आझाद चौक येथील ६५ वर्षीय पुरुष, लालगंज येथील ४३ वर्षीय पुरुष, बडकस चौक महाल येथील ७३ वर्षीय पुरुष, तांडापेठ येथील ६६वर्षीय पुरुष, डागा हॉस्पिटलजवळील गांजाखेत येथील ७० वर्षीय महिला, नागसेनवन विनोबाभावे नगर येथील ५७ वर्षीय पुरुष व गांधीबाग येथील ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या १८ रुग्णांमध्ये एक ग्रामीण भागातील, १६ शहरातील तर एक जिल्ह्याबाहेरील आहे. इतर मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

अ‍ॅण्टिजेन चाचणीत ३०१ रुग्ण पॉझिटिव्ह
शहरात १० झोनमधील आरोग्य केंद्रांवर व ग्रामीण भागातही लक्षणे असलेल्या रुग्णांची नि:शुल्क रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली जात आहे. यामुळे चाचण्यांची संख्या वाढली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज ३०१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. या शिवाय, आरटीपीसीआर चाचणी करीत असलेल्या मेडिकलमधून ९१, मेयोमधून १०३, एम्समधून ५६, नीरीमधून ३२, माफसूमधून ३८, खासगी लॅबमधून १०६ असे एकूण ७२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज १८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ५,५१६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ग्रामीणमध्ये ५५१ तर शहरात १,१०६ असे एकूण १,६५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

व्हीएनआयटी सीसीसीमधील डॉक्टर, कर्मचारी पॉझिटिव्ह
व्हीएनआयटी येथील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, फार्मासिस्ट, परिचारिका व कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या या ठिकाणी २०२ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आपली चाचणी केली असता तब्बल आठ जण पॉझिटिव्ह आले.

दैनिक संशयित : ३५४
बाधित रुग्ण : ११,७०९
बरे झालेले : ५,५१६
उपचार घेत असलेले रुग्ण : १,६५७
मृत्यू : ४२०

Web Title: Corona Virus in Nagpur: Corona Virus free Rate in Nagpur is 47%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.