CoronaVirus in Nagpur : नागपुरात १२ मृत्यू, २,८१९ कोरोनाबाधित आले कुठून : रुग्ण व मृत्यूसंख्येतील घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:18 AM2020-09-25T00:18:08+5:302020-09-25T00:19:37+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध माहितीच्या आधारे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावल्याचे दिसून येत आहे. मात्र, बुधवार आणि गुरुवारच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल २,८१९ रुग्णांचा व १२ मृतांचा फरक आहे. जाणीवपूर्वक रोजचे रुग्ण व मृतांची संख्या कमी दाखविण्याचा हा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Corona virus in Nagpur: 12 deaths in Nagpur, 2,819 corona outbreaks from where: Confusion of Patients and deaths | CoronaVirus in Nagpur : नागपुरात १२ मृत्यू, २,८१९ कोरोनाबाधित आले कुठून : रुग्ण व मृत्यूसंख्येतील घोळ

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १२ मृत्यू, २,८१९ कोरोनाबाधित आले कुठून : रुग्ण व मृत्यूसंख्येतील घोळ

Next
ठळक मुद्दे१,१२६ नव्या रुग्णांची भर तर ४४ मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध माहितीच्या आधारे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावल्याचे दिसून येत आहे. मात्र, बुधवार आणि गुरुवारच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल २,८१९ रुग्णांचा व १२ मृतांचा फरक आहे. जाणीवपूर्वक रोजचे रुग्ण व मृतांची संख्या कमी दाखविण्याचा हा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील २३ सप्टेंबर रोजी एकूण रुग्णसंख्या ६७,६७१ तर मृतांची संख्या २,२०५ होती. आज यात १,१२६ नव्या रुग्णांची तर ४४ मृत्यूची भर पडली. त्यानुसार रुग्णसंख्या ६८,७९७ व मृतांची संख्या २,२४९ होणे अपेक्षित होते. परंतु आज रुग्णांची एकूण संख्या ७१,६१६ तर मृतांची संख्या २,२६१ वर पोहचली. विशेष म्हणजे, रुग्णसंख्येतील घोळ मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांच्या आकडेवारीत एकसूत्रता नसल्याच्या तक्रारी असतानाही वेळीच याकडे लक्ष देण्यात आले नाही. यामुळे आता कोरोनाच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे.

१,५०६ रुग्ण बरे
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज १,५०६ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५३,४१८ झाली आहे. या संख्येतही घोळ झाल्याने टक्के वारी ८० वरून ७४.५९ वर आली आहे. सध्या १५,९३७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

८,३०६ चाचण्यांमधून ७,१८० निगेटिव्ह
जिल्ह्यात शहरामध्ये १,३९५ तर ग्रामीणमध्ये ३,६८० असे एकूण ५,०७५ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. शहरामध्ये १,९०३ तर ग्रामीणमध्ये १,३२८ असे एकूण ३,२३१ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्या झाल्या. दोन्ही मिळून ८,३०६ चाचण्यांतून ७,१८० चाचण्या निगेटिव्ह आल्या. कोरोनाच्या आतापर्यंतच्या कालावधीत हे पहिल्यांदाच झाले आहे.

रुग्ण दुपटीचा दर २९.१ दिवसांवर
रुग्ण दुपटीचा दर २९.१ दिवसांवर आला आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. गुरुवारी सर्वाधिक रुग्णाची नोंद मनपाच्या लक्ष्मीनगर झोनमध्ये झाली. १२८ बाधित आढळून आले. धरमपेठ झोनमध्ये ९८, हनुमाननगर झोनमध्ये १२२, धंतोली झोनमध्ये ७५, नेहरुनगर झोनमध्ये ८१, गांधीबाग झोनमध्ये ६०, सतरंजीपुरा झोनमध्ये ३२, लकडगंज झोनमध्ये ७०, आशीनगर झोनमध्ये ७४ तर मंगळवारी झोनमध्ये ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,३६५
बाधित रुग्ण : ७१,६१६
बरे झालेले : ५३,४१८
उपचार घेत असलेले रुग्ण : १५,९३७
मृत्यू : २,२६१

Web Title: Corona virus in Nagpur: 12 deaths in Nagpur, 2,819 corona outbreaks from where: Confusion of Patients and deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.