नागपूर जिल्ह्यात कोरोना वाढतोय, काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:17 PM2020-11-17T22:17:57+5:302020-11-17T22:18:22+5:30

मंगळवारी नागपूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढली आहे. मंगळवारी जिल्ह्यात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

Corona is growing in Nagpur district, be careful | नागपूर जिल्ह्यात कोरोना वाढतोय, काळजी घ्या

नागपूर जिल्ह्यात कोरोना वाढतोय, काळजी घ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रिकव्हरी पॉझिटिव्हच्या तुलनेत वाढली होती. परंतु मंगळवारी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढली आहे. मंगळवारी जिल्ह्यात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या २११ आहे. मृतांमध्ये ग्रामीणचे ३, शहरातील २ व जिल्ह्याबाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यूची संख्या ३,५३१ झाली आहे. मंगळवारी ४४ ग्रामीणमध्ये, २१८ शहरात व जिल्ह्याबाहेरील १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत १,०६,८२४ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १,००,१९९ झाली आहे. मंगळवारी ग्रामीण भागात ८३६ व शहरात ३,२५६ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. सद्य:स्थितीत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,०९४ आहे.

Web Title: Corona is growing in Nagpur district, be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.