अत्यावश्यक काम असेल तरच मनपात या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 08:29 PM2020-08-13T20:29:52+5:302020-08-13T20:32:11+5:30

शहरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. याचा शिरकाव आता मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात झालेला आहे. अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याचा विचार करता अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी मनपा कार्यालयात यावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे

Come to NMC only if there is an urgent work! | अत्यावश्यक काम असेल तरच मनपात या!

अत्यावश्यक काम असेल तरच मनपात या!

Next
ठळक मुद्देसंसर्ग टाळण्यासाठी आयुक्तांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. याचा शिरकाव आता मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात झालेला आहे. अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याचा विचार करता अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी मनपा कार्यालयात यावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे
मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात दररोज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छता, आरोग्य विभाग, अग्निशमन विभागाद्वारा नागरिकांना अत्यावश्यक सेवा दिल्या जातात. सदर सेवा काही प्रमाणात बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सेवा बाधित होऊ नये यासाठी सर्व संबंधित अधिकारी, क र्मचारी यांच्या सुरक्षेचे दृष्टीने सदर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.
नागरिकांना मनपाच्या कोणत्याही अत्यावश्यक कामाविषयी तक्रार असल्यास ते मनपाचे ‘नागपूर लाईव्ह सिटी ‘ मोबाईल अ‍ॅप वर तक्रार नोंदवू शकतात. या अ‍ॅपव्दारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत मनपा प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागरिकांनी मनपा मध्ये येण्याची कोणतीही गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना कोविड-१९ संबंधी तक्रार असल्यास मनपा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२१, २५५१८६६ तसेच पाणीपुरवठा व चोकेजसंबंधी तक्रारी असल्यास ०७१२-२५६५५०९ वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Come to NMC only if there is an urgent work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.