सिगरेटच्या तुकड्याने सिद्ध केला खून; पतीची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 05:51 PM2021-09-28T17:51:17+5:302021-09-28T18:29:46+5:30

Nagpur News चंद्रपूर जिल्ह्यातील एका खून प्रकरणामध्ये घटनास्थळी सापडलेला सिगारेटचा तुकडा महत्त्वपूर्ण पुरावा ठरला. त्या तुकड्यावरील अर्काचा डीएनए व आरोपीचा डीएनए सारखा आढळला. त्यामुळे आरोपी घटनास्थळी उपस्थित होता हे स्पष्ट झाले.

A cigarette butt proved murder; Husband's life sentence for wife's murder remains | सिगरेटच्या तुकड्याने सिद्ध केला खून; पतीची जन्मठेप कायम

सिगरेटच्या तुकड्याने सिद्ध केला खून; पतीची जन्मठेप कायम

Next


नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एका खून प्रकरणामध्ये घटनास्थळी सापडलेला सिगारेटचा तुकडा महत्त्वपूर्ण पुरावा ठरला. त्या तुकड्यावरील अर्काचा डीएनए व आरोपीचा डीएनए सारखा आढळला. त्यामुळे आरोपी घटनास्थळी उपस्थित होता हे स्पष्ट झाले.

(A cigarette butt proved murder; Husband's life sentence for wife's murder remains)

आरोपीने तो घटनास्थळी उपस्थित नव्हता असा दावा केला होता, पण त्याने स्वत: पिलेल्या सिगारेटच्या तुकड्यानेच त्याला खोटे ठरवले.
रमेश सदाशीव जावळे (६१) असे आरोपीचे नाव असून तो बल्लारशा येथील रहिवासी आहे. त्याने पत्नीचा खून केला आहे. घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. घटना घडली त्यावेळी घरी उपस्थित नव्हतो, नागपूरला गेलो होतो, असा बचाव जावळेने केला होता. परंतु, हा बचाव त्याला वाचवू शकला नाही.

 

पोलिसांना घटनास्थळी सिगारेटचा तुकडा मिळून आला होता. त्या तुकड्यावरील अर्काचा डीएनए व आरोपीचा डीएनए सारखा आढळला. याशिवाय, आरोपीच्या कपड्यांवरील व खुनासाठी वापरलेल्या लाकडी काठीवरील रक्ताचा डीएनए आणि मृताचा डीएनए समान आढळला. तसेच घटनेच्या दिवशी रात्री शेजाऱ्यांनी आरोपीला घरी पाहिले होते. या सर्व बाबींवरून आरोपीनेच पत्नीचा खून केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जावळेची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ११ मे २०१८ रोजी सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावल्यानंतर जावळेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील फेटाळण्यात आले.

हेतूही सिद्ध झाला

मृताचे नाव सविता होते. आरोपीने तिचा खून करण्यामागील हेतूही सिद्ध झाला. आरोपीचे विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून त्याचे पत्नीसोबत नेहमी भांडण होत होते. याशिवाय आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. त्यातून त्याने १० जून २०१५ रोजी पत्नीचा खून केला.

Web Title: A cigarette butt proved murder; Husband's life sentence for wife's murder remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app