छगन भुजबळ आजपासून विदर्भ दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 08:00 AM2021-10-17T08:00:00+5:302021-10-17T08:00:06+5:30

Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे रविवारपासून विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

Chhagan Bhujbal on Vidarbha tour from today | छगन भुजबळ आजपासून विदर्भ दौऱ्यावर

छगन भुजबळ आजपासून विदर्भ दौऱ्यावर

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे रविवारपासून विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सायंकाळी ७.३० वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होईल. सोमवारी सकाळी ९ वाजता ते गडचिरोलीला रवाना होतील. गडचिरोलीत दुपारी १ वाजता महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Chhagan Bhujbal on Vidarbha tour from today)

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथेही सायंकाळी ५ वाजता आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. रात्री चंद्रपूर येथे मुक्काम करतील. मंगळवारी दुपारी १२ वाजता चंद्रपुरातील जनता महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्याच दिवशी नागपूरला रविभवनात सायंकाळी ५ वाजता महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीला भुजबळ संबोधित करतील.

Web Title: Chhagan Bhujbal on Vidarbha tour from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.