'रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 11:48 AM2021-10-19T11:48:10+5:302021-10-19T12:02:24+5:30

महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal: Pressure on ministers continues to destabilize the government | 'रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा'

'रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा'

Next
ठळक मुद्देसरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दाबवा टाकणे सुरू

नागपूर : रेशनवरील धान्य वितरणातील घोळाची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे भुजबळ यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

रेशन धान्य वितरणातील घोटाळा अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची शिफारस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले. दिल्लीतून कुणाला पाठवले आणि कारवाई केली असे आमच्या सरकारमध्ये होत नाही. येथे लोकशाही आहे, असा टोलाही त्यांनी केंद्रातील भाजपला लगावला.

शिवसेना ओबीसींसाठी सोडली

गडचिरोलीत आयोजित राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या मेळाव्याला रवाना होताना ते म्हणाले, मी शिवसेनाच ओबीसीच्या कारणांमुळे सोडली. तेव्हा नागपुरात कुठे कुठे गेलो होतो ते सर्वांना माहीत आहे. जीवाशी खेळून त्यावेळी मी पक्षांतर केले. तेव्हापासून आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहे. ओबीसींना आरक्षण लागू झाले तेव्हापासून ओबीसी विरोधक न्यायालयात जात आहेत. महाविकास आघाडी सरकार ओबीसींसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दबाव टाकणे, धाडी टाकणे सुरू आहे. आमच्यावेळेससुद्धा जेलमध्ये गेल्यावरही धाडी टाकण्यात आल्या. छोट्या छोट्या घरात आयटीचे अधिकारी बसतात. शत्रुत्वाच्या भावनेतून हे करणे सुरू आहे. गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदाच देशात अशा प्रकारचे वातावरण तयार झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरामुळे भाजपची प्रतिमा लोकांमध्ये डागाळेल, असा दावा करीत याचा विचार फडणवीस यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे. सरकार पडण्याची भीती नाही, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Chhagan Bhujbal: Pressure on ministers continues to destabilize the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.