This cement road in Nagpur is right, the rest are wrong? | नागपुरातील हा सिमेंट रोड योग्य, बाकीचे चुकीचे आहेत का?
नागपुरातील हा सिमेंट रोड योग्य, बाकीचे चुकीचे आहेत का?

ठळक मुद्देरहाटे कॉलनी ते अजनी चौक दरम्यानच्या सिमेंट रोडचा वादमनपाचे इंजिनियर म्हणतात हाच रस्ता योग्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तसे तर शहरातील सिमेंट रोड विविध कारणांची चर्चेचा विषय ठरले आहेत. पण सध्या रहाटे कॉलनी ते अजनी चौक दरम्यान बनविण्यात येत असलेल्या सिमेंट रोडची चर्चा काही जास्तच आहे. या रस्त्याची वरची पातळी खडबडीत आहे. या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण मनपाचे इंनिजियर्स म्हणतात की हा सिमेंट रोड योग्य आहे. शहरात बनलेले इतर सिमेंटच्या रस्त्याची वरची पातळी सपाट आहे. त्यामुळे हे रोड चुकीचे आहेत, असा प्रश्न मनपाच्या इंजिनियर्सनी केलेल्या दाव्यामुळे उपस्थित होत आहे.
तीन वर्षापर्यंत रस्त्याची वरची पातळी खडबडीत असावी
महापालिकेच्या इंजिनियर्सनी लोकमतला सांगितले की, सिमेंट रोडची निर्मिती करताना रस्त्याच्या वरची पातळी खडबडीत ठेवणे आवश्यक आहे. कुठल्याही सिमेंट रोडची वरची पातळी किमान तीन वर्षे खडबडीत राहणे आवश्यक आहे. जर रस्ता सपाट असेल तर वाहने घसरण्याची भीती असते. मनपाच्या अभियंत्यांच्या मतानुसार विचार केल्यास रहाटे चौक ते अजनी चौक दरम्यान बनत असलेला सिमेंट रोड अगदी योग्य आहे. पण शहरात इतरत्र जे सिमेंट रोड बनले त्यांची वरची पातळी सपाट आहे. त्यामुळे हे रस्ते वाहनांच्या आवागमनासाठी धोकादायक ठरू शकते.
रस्त्याच्या मानकानुसार योग्य निर्माण
या रस्त्याचे निर्माण काही वेगळ्या पद्धतीने करण्यात येत नाही. रस्त्याच्या निर्मितीचे जे मानक आहे, त्या नुसारच रस्ता बनविण्यात येत आहे. रस्त्याच्या वरच्या पातळीवर ब्रुमिंग करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांची रस्त्यावर पकड चांगली बसते. डेप्युटी इंजिनियर्सशी बोलल्यानंतर ते आणखी माहिती देऊ शकतात.
-अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता, मनपा

वरचा भाग खडबडीत असणे आवश्यक
सिमेंट रोडचे निर्माण कार्य करताना वाहनांच्या टायरची पकड चांगली बसावी, यासाठी रस्त्याचा वरचा भाग खडबडीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे या रस्त्याच्या निर्माणादरम्यान आम्ही रस्त्याचा वरचा भाग खडबडीत बनविला आहे.
- अनिल गेडाम, डेप्युटी इंजिनियर, मनपा


Web Title: This cement road in Nagpur is right, the rest are wrong?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.