काेराेना संक्रमण आलेख चढतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:08 AM2021-04-13T04:08:57+5:302021-04-13T04:08:57+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/कळमेश्वर/हिंगणा/नरखेड/काटाेल/रामटेक/कुही/उमरेड : नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमित रुग्णांचा चढता आलेख साेमवारी (दि. १२)ही कायम राहिला. जिल्ह्यात सर्वाधिक ...

Carina transition graph on the rise | काेराेना संक्रमण आलेख चढतीवर

काेराेना संक्रमण आलेख चढतीवर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर/कळमेश्वर/हिंगणा/नरखेड/काटाेल/रामटेक/कुही/उमरेड : नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमित रुग्णांचा चढता आलेख साेमवारी (दि. १२)ही कायम राहिला. जिल्ह्यात सर्वाधिक ५०५ रुग्ण सावनेर तालुक्यात आढळून आले असून, कळमेश्वर तालुक्यात ३५१, हिंगण्यात २१७, नरखेड तालुक्यात १८६, रामटेक तालुक्यात १९४, काटाेलमध्ये १५५, कुही तालुक्यात प्रत्येकी १४४ तर उमरेड तालुक्यात ६६ रुग्णांची नाेंद करण्यात आली.

सावनेर तालुक्यात साेमवारी ५०५ रुग्णांची भर पडली असून, यात सावनेर शहरातील १०६, तर ग्रामीण भागातील ३९९ रुग्ण आहेत. कळमेश्वर तालुक्यात ३५१ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ४३, तर ग्रामीण भागातील ३०८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये मोहपा शहरातील ६३, कन्याडोल येथील १८, कोहळी येथील १५, तोंडाखैरी येथील १३, सवंद्री व खुमारी येथील प्रत्येकी १२, गोंडखैरी व तेलगाव येथील प्रत्येकी ११, तेलकामठी येथील १०, पारडी (देशमुख), घोराड व सुसंद्री येथील प्रत्येकी ९, म्हसेपठार, वाढोणा व लोहगड येथील प्रत्येकी ८, बोरगाव येथील ७, उबाळी, गळबर्डी व तिष्टी (बु) येथील प्रत्येकी ६, परसोडी व पिपळा येथील प्रत्येकी ५, धापेवाडा, खापरी व बोरगाव (बु.) येथील प्रत्येकी ४, १४ मैल, पानउबाळी, मांडवी, मोहगाव व देवबर्डी येथील प्रत्येकी ३, आदासा, लोणारा, चाकडोह, सोनुली, वाढोणा (बु), पिल्कापार, उबगी, सोनेगाव, दहेगाव, घोगली व खैरी येथील प्रत्येकी २ तसेच वरोडा, उपरवाही, साहुली, मडासावंगी, सेलू, आष्टी (कला), कोकर्डा, चिचभवन, तिडगी, नांदिखेडा, तिष्टी (खु), निळगाव, भंडागी व लिंगा येथील प्रत्येकी एक रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह आहे.

हिंगणा तालुक्यातही २१७ रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांमध्ये वानाडाेंगरी शहरातील ७४, हिंगणा शहरातील ३०, डिगडोह येथील १९, इसासनी येथील १६, टाकळघाट येथील १५, नीलडोह येथील १४, रायपूर येथील १३, आमगाव येथील ६, वागदरा व कवडस व जुनेवानी येथील प्रत्येकी ५, गुमगाव व अडेगाव येथील प्रत्येकी ३, वडधामना येथील २ तर खापरी (गांधी), खैरी (पन्नासे), मोहगाव, खिरोदा, कवडसा, देवळी व पिपळधरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ७,९६३ झाली असून, ५,५०९ काेराेनामुक्त झाले आहेत, तर १५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नरखेड तालुक्यात १८६ रुग्ण काेराेनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून, यात नरखेड या शहरातील ४४, तर ग्रामीण भागातील १४२ रुग्ण आहेत. या १४२ रुग्णांमध्ये जलालखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमध्ये ७३, सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमध्ये ५२, मेंढला १०, तर मोवाड प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमधील ७ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १,११८ असून, यात ग्रामीण भागातील ९४२ व नरखेड शहरातील १८६ रुग्ण आहेत.

Web Title: Carina transition graph on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.