गांभीर्य नाहीच... काेराेना रुग्णाच्या बेजबाबदारपणामुळे शेजारी धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:28+5:302021-04-10T11:25:46+5:30

नागपूर  : सलरकार आणि प्रशासनाकडून सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले तरी काही लाेकांचा बेजबाबदारपणा जात नाही. सामान्यच नाही तर ...

Caerena burns the neighbor because of the patient's irresponsibility | गांभीर्य नाहीच... काेराेना रुग्णाच्या बेजबाबदारपणामुळे शेजारी धाेक्यात

गांभीर्य नाहीच... काेराेना रुग्णाच्या बेजबाबदारपणामुळे शेजारी धाेक्यात

googlenewsNext

नागपूर : सलरकार आणि प्रशासनाकडून सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले तरी काही लाेकांचा बेजबाबदारपणा जात नाही. सामान्यच नाही तर काेराेना संसर्ग झालेल्या रुग्णांच्याही अशा वागण्यामुळे इतरांचे आराेग्य धाेक्यात येत आहे. नागपूरजवळ वानाडाेंगरी शहरात असाच प्रकार समाेर आला आहे. येथील एका साेसायटीतील काेराेनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकाच्या बेजबाबदार वागणुकीने इतरांवर संसर्गाचे संकट बळावले आहे.

वानाडाेंगरीच्या पायाेनियर वूड्स साेसायटीत राहणाऱ्या डाॅ. प्रीती राऊत यांनी साेसायटीतील नागरिकांच्यावतीने लाेकमतकडे याबाबत तक्रार दिली आहे. त्यांनी सांगितले, साेसायटीतील एका ६३ वर्षीय गृहस्थांना काेराेनाचे निदान झाले. त्यांना घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, या गृहस्थाचा स्वत:चा थ्री-बीएचके फ्लॅट आहे व दाेघेच पतीपत्नी त्यामध्ये राहतात. येथे सहज विलगीकरणात राहणे शक्य हाेते. पण त्यांनी स्वत:च्या घराला कुलूप लावून ओळखीच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहणे सुरू केले. या गृहस्थाचा बेजबाबदारपणा इथेच संपला नाही. खिडक्या उघड्या ठेवून मास्क न लावता तेथे बसणे, फ्लॅटसमाेरील जागेत विनामास्क फिरणे, वापरात असलेल्या लिफ्टपर्यंत विनामास्क फिरणे, शेजाऱ्यांच्या घरासमाेरील खुर्च्या व इतर वस्तूंना स्पर्श करणे सर्रास सुरू आहे. डाॅ. राऊत यांचे कुटुंब शेजारीच राहत असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास त्यांना सहन करावा लागताे आहे. त्यांना लहान मुलगी असल्याने भीती आणखी वाढली आहे. त्यामुळे, त्या स्वत: काही दिवस हाॅटेलमध्ये तर काही दिवस आईकडे राहायला गेल्या.

डाॅ. राऊत यांनी याबाबत साेसायटीचे पदाधिकारी, नगर परिषद, आराेग्य विभाग, पाेलीस यांच्यापासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत तक्रार केली आहे. साेसायटीने या गृहस्थाला समज दिली. नगर परिषदेने नाेटीस बजावले. सीएमओनेही दखल घेत संबंधित व्यक्तीला नाेटीस बजावली आहे. मात्र, कारवाई हाेत नसल्याने गृहस्थाचा आडमुठेपणा कायम आहे. ज्येष्ठ म्हणून सहानुभूती असली तरी या बेजबाबदारपणामुळे इतरांच्या जीवावर बेतण्याची भीती साेसायटीकरांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Caerena burns the neighbor because of the patient's irresponsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.