‘कस्तुरबा गांधी’ यांच्या वेदना आणल्या समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:23 PM2019-09-14T23:23:55+5:302019-09-14T23:30:26+5:30

‘बा’ ला जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मला ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ हे पुस्तक लिहिण्याला प्रेरित केले. यासाठी सातत्याने सात वर्षे अध्ययन केले. ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ यासंदर्भात आपले अनुभव प्रसिद्ध लेखिका नीलिमा डालमिया आधार यांनी नागपूरकर वाचकांसमोर व्यक्त केले.

Brought the pain of 'Kasturba Gandhi' | ‘कस्तुरबा गांधी’ यांच्या वेदना आणल्या समोर

‘कस्तुरबा गांधी’ यांच्या वेदना आणल्या समोर

Next
ठळक मुद्देप्रसिद्ध लेखिका नीलिमा डालमिया आधार यांचा नागपूरकर वाचकांसोबत संवादप्रभा खेतान प्रकाशन, लोकमत व अहसास वूमन ऑफ नागपूरचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधी यांच्यावर भरपूर लिहिले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत गांधीजींनी दिलेल्या योगदानामध्ये त्यांची पत्नी ‘बा’ म्हणजेच कस्तुरबा गांधी यांचीही महत्त्वाची भूमिका होती. कस्तुरबा यांची मैत्रीण नमिता गोखले यांनी २००२ मध्ये कस्तुरबा गांधी यांची आवाज व त्यांच्या वेदना समोर आणण्याची गरज व्यक्त केली होती. त्यामुळे ‘बा’ ला जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मला ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ हे पुस्तक लिहिण्याला प्रेरित केले. यासाठी सातत्याने सात वर्षे अध्ययन केले. ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ यासंदर्भात आपले अनुभव प्रसिद्ध लेखिका नीलिमा डालमिया आधार यांनी नागपूरकर वाचकांसमोर व्यक्त केले.
त्या म्हणाल्या की, मोहनदास करमचंद गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली होती. तर कस्तुरबा गांधी यांनी आपल्या जीवनाची ६२ वर्षे एक समर्पित पत्नी, एक सत्याग्रही व त्यागमूर्ती आई म्हणून भूमिका बजावली. शुक्रवारी प्रभा खेतान प्रकाशन यांच्यावतीने ‘कलम’ ‘अपनी भाषा अपने लोग’ या उपक्रमांतर्गत लोकमत व अहसास वूमन ऑफ नागपूरतर्फे हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित लेखक-वाचक संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे संचालन अहसास वूमन ऑफ नागपूरच्या सदस्य परवीन तुली व प्रियंका कोठारी यांनी केले. दरम्यान, नीलिमा डालमिया आधार यांना वाचकांनी त्यांच्या ‘फादर डियरेस्ट : द लाईफ अ‍ॅण्ड टाइम्स ऑफ आर. के. डालमिया’, ‘मर्चेंट्स ऑफ डेथ’, व ‘सिक्रेट डायरी ऑफ कस्तुरबा’ या पुस्तकांच्या बाबतीत प्रश्न केले, त्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर लेखिका आधार यांनी दिले. कार्यक्रमादरम्यान हॉटेल रेडिसनचे महाव्यवस्थापक मनोज बाली यांनी लेखिका नीलिमा डालमिया आधार यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

Web Title: Brought the pain of 'Kasturba Gandhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.