भू-संपादन विभागातील लाचखोर लिपिक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:24 PM2020-02-24T23:24:33+5:302020-02-24T23:26:04+5:30

प्रकल्पग्रस्त शेतमजुराला भूसंपादनाच्या अतिरिक्त मोबदल्याच्या बदल्यात ७ हजारांची लाच मागणाऱ्या एका लाचखोराला एसीबीने जेरबंद केले.

Bribery clerk in land acquisition division arrested | भू-संपादन विभागातील लाचखोर लिपिक जेरबंद

भू-संपादन विभागातील लाचखोर लिपिक जेरबंद

Next
ठळक मुद्देअतिरिक्त मोबदल्यात मागितले सात हजार : एसीबीकडून ‘डिमांड’चा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रकल्पग्रस्त शेतमजुराला भूसंपादनाच्या अतिरिक्त मोबदल्याच्या बदल्यात ७ हजारांची लाच मागणाऱ्या एका लाचखोराला एसीबीने जेरबंद केले. दिलीप शंकरराव खेडकर (वय ५३) असे आरोपीचे नाव आहे. तो भू-संपादन विभागात कनिष्ठ लिपिक आहे.
तक्रारदार व्यक्ती कुही तालुक्यातील जीवनापूरचे रहिवासी होय. ते मोलमजुरी करतात. त्यांच्या आईच्या नावाने गावात ६ एकर शेत आणि घर होते. गोसेखुर्द प्रकल्पात ते गेले. ज्यावेळी भूसंपादन प्रक्रिया झाली त्यावेळी तक्रारदार यांची मुले अन् अन्य वारसदार छोटी (अल्पवयीन) होती. त्यामुळे वारसदारांची नावे कमी दिली गेली होती. आठ वर्षांपूर्वी तक्रारदारांच्या आईचा मृत्यू झाला आणि वारसदार आता सज्ञान झाले. त्यामुळे वाढीव मोबदल्याचा दावा सरकारकडून मंजूर झाला. त्यामुळे तक्रारदाराला वाढीव कुटुंबातील सदस्यांचा अतिरिक्त मोबदला म्हणून २ लाख ९० हजार रुपये मिळणार होते. या रकमेच्या बदल्यात आरोपी खेडकरने तक्रारदाराला १० हजारांची लाच मागितली होती. ही रक्कम द्यायची ईच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी लाचखोर खेडकरसोबत बोलण्यास सांगितले. यावेळी तक्रारदाराने लाचखोर खेडकरशी सौदेबाजी केली. पंचासमोर खेडकरने १० ऐवजी ७ हजारांची लाच पाहिजे म्हणून मागणी केली. त्याचे तक्रारदाराने रेकॉर्डिंग केले. ठरल्याप्रमाणे खेडकरने ही लाचेची रक्कम घेऊन तक्रारदाराला बोलविले. दुसरीकडे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारदाराला पावडर लावलेल्या नोटा देऊन पाठविले. मात्र आरोपी कार्यालयातून निघून गेला. तो रक्कम घेण्यास टाळाटाळ करू लागल्यामुळे खेडकरविरुध्द पोलिसांनी लाचेची मागण्याचा गुन्हा सदर पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल केला.
अटक अन् घरझडतीही
आरोपीला सोमवारी लाच मागण्याच्या आरोपात एसीबीने अटक केली. त्याच्या गोपाळनगरातील घरी झडतीही घेण्यात आली. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा कार्यालयाचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, नायक सचिन हलमवारे, सुशील हुकरे, कुणाल कढव, दिनेश धार्मिक आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Bribery clerk in land acquisition division arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.