नागपुरात बुकीने केला बलात्कार, ब्लॅकमेलिंगचाही आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:09 PM2021-06-12T23:09:08+5:302021-06-12T23:09:46+5:30

Rape by bookie एकटी राहणाऱ्या महिलेच्या घरी जाऊन बुकीने त्याच्या नातेवाईक महिलेवर बलात्कार केला. शरीरसंबंधाचे अश्लील फोटो काढून त्या आधारे तो चार वर्षांपासून ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार सदर महिलेने (वय ३२) नंदनवन पोलीस ठाण्यात केली.

Bookie raped, blackmailed in Nagpur | नागपुरात बुकीने केला बलात्कार, ब्लॅकमेलिंगचाही आरोप

नागपुरात बुकीने केला बलात्कार, ब्लॅकमेलिंगचाही आरोप

Next
ठळक मुद्देनातेवाईक महिलेची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - एकटी राहणाऱ्या महिलेच्या घरी जाऊन बुकीने त्याच्या नातेवाईक महिलेवर बलात्कार केला. शरीरसंबंधाचे अश्लील फोटो काढून त्या आधारे तो चार वर्षांपासून ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार सदर महिलेने (वय ३२) नंदनवन पोलीस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी अनुप किशोर गणात्रा (वय ३५) आणि त्याचा साथीदार रमेश वसंतराव आंबिलडुके (वय ३३, रा. पारडी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा पती व्यवसायाच्या निमित्ताने गोंदियाला राहतो. महिला येथे एकटीच राहते. दूरचा नातेवाईक असल्यामुळे आरोपी अनुप गणात्रा नेहमीच तिच्याकडे यायचा. त्यांच्यात चांगले संबंध होते. २७ डिसेंबर २०१७ ला असाच तो घरी आला आणि त्याने तिच्याशी शरीरसंबंध जोडले. त्यानंतर तो वारंवार तिच्याकडे येऊन तिच्याशी शरीरसंबंध जोडू लागला. शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास अनुप त्याचा मित्र रमेशला घेऊन महिलेच्या घरी आला. त्याला दारावर बसवले अन् अनुपने महिलेवर बलात्कार केला. महिलेने विरोध केला असता, तिला तिच्यासोबतच्या शरीरसंबंधाचे अश्लील फोटो दाखवून ते व्हायरल करण्याची तिला धमकी दिली. त्यामुळे महिलेने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी केली जात आहे.

विलंबाचा मुद्दा तपासाचा विषय

आरोपी गणात्रा हा बुकी असल्याचे पोलीस सांगतात. या प्रकरणातील तक्रारीचा विलंब अन् अश्लील फोटोचा मुद्दाही तपासाचा विषय ठरला आहे.

Web Title: Bookie raped, blackmailed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.