कोळसा कंपनीच्या नावाने काढली तब्बल ८८ हजार नोकऱ्यांची बोगस जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 05:15 AM2019-08-22T05:15:58+5:302019-08-22T05:20:01+5:30

नोकरीसाठी खुल्या वर्गातील अर्जदारांना ३५० तर अनुसूचित जाती-जमातीसाठी १८० रुपये प्रवेश शुल्क घेण्यात येत आहे. नागपुरातूनही असंख्य युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहे.

 Bogus advertisement of nearly 4,000 jobs in the name of coal company | कोळसा कंपनीच्या नावाने काढली तब्बल ८८ हजार नोकऱ्यांची बोगस जाहिरात

कोळसा कंपनीच्या नावाने काढली तब्बल ८८ हजार नोकऱ्यांची बोगस जाहिरात

Next

नागपूर : कोल इंडियाशी संलग्न साऊथ सेंट्रल कोल फील्डने ८८,५८५ जागांसाठी नोकरीची जाहिरात वेबसाईटवर प्रकाशित केली. नोकरीसाठी खुल्या वर्गातील अर्जदारांना ३५० तर अनुसूचित जाती-जमातीसाठी १८० रुपये प्रवेश शुल्क घेण्यात येत आहे. नागपुरातूनही असंख्य युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहे. परंतु ही पदभरती बोगस असल्याचे दिसत आहे. यात लाखो बेरोजगार युवकांची फसवणूक होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.
यासाठी तयार केलेल्या वेबसाईटवर कोल इंडिया व कोळसा मंत्रालयाचा लोगो आहे. खुल्या वर्गातील १८ ते ३३, अनुसूचित जाती व ओबीसीसाठी ३५ वर्षे वयोगटाच्या उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. हे अर्ज १९ आॅगस्टपर्यंत पाठवायचे होते.
बेरोजगार युवक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी या नोकरीसाठी अर्ज केले. पण काही उमेदवारांनी कोल इंडियाकडे चौकशी केली असता, अशी पदभरती आम्ही करीत नाही आहोत, असे सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारांना आपली फसगत झाल्याचे निदर्शनास आले.

Web Title:  Bogus advertisement of nearly 4,000 jobs in the name of coal company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर