कोळशाचा काळा धंदा; दगड, गिट्टीला देतात मुलामा; जागोजागी ठिय्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 10:27 PM2021-10-20T22:27:10+5:302021-10-20T22:32:45+5:30

कोलमाफिया चोरलेल्या कोळशाचा मुलामा दगड, गिट्टीला देऊन तसेच त्यात काळा चुरा मिक्स करून त्याची कोळसा म्हणून विक्री करून कोलमाफिया सरकार आणि उद्योजकांना फसवत आहेत.

Black business of coal; Stone, ballast charcoal | कोळशाचा काळा धंदा; दगड, गिट्टीला देतात मुलामा; जागोजागी ठिय्ये

कोळशाचा काळा धंदा; दगड, गिट्टीला देतात मुलामा; जागोजागी ठिय्ये

Next
ठळक मुद्देबेमालूमपणे केली जाते भेसळकोलमाफियांनी अवलंबले सोनेरी टोळ्यांचे तंत्र

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पितळेच्या दागिन्यांना सोन्याचा मुलामा चढवून किंवा पितळेच्या मण्यांमध्ये एखादं दुसरा मणी घालून ती माळ अस्सल सोन्याची आहे, असे भासविणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. दरवर्षी ठिकठिकाणी हे नकली सोने विकून या टोळ्या अनेकांना लाखोंचा गंडा घालतात. सोनेरी टोळ्या म्हणून पोलीस आणि गुन्हेगारी वर्तुळात त्या कुपरिचित आहेत. नागपूर - विदर्भातील कोलमाफियांनीही असेच तंत्र अवलंबले आहे. हे माफिया चोरलेल्या कोळशाचा मुलामा दगड, गिट्टीला देऊन तसेच त्यात काळा चुरा मिक्स करून त्याची कोळसा म्हणून विक्री करून कोलमाफिया सरकार आणि उद्योजकांना फसवत आहेत.

नागपुरात वेगवेगळ्या भागातून कोळशाचे रोज दोनशेपेक्षा जास्त ट्रक येतात. त्यांच्यापैकी कोलमाफियांशी सेटिंग असलेला कोळशाचा ट्रक पारडी, कापसी, महालगाव, तरोडी, कोराडी, कन्हान आणि आजुबाजूच्या भागात पोहोचतो. कोलमाफियांनी या भागात जागोजागी ठिय्ये तयार केले आहेत. त्यातील काही रस्त्यालगत तर काही शेतात अन् झाडाझुडपात आहेत. यातील काही ठिय्ये सहज नजरेला पडतात.

जबलपूर - हैदराबाद महामार्गाच्या पुलावर चढल्यासही काही ठिय्ये दिसतात. जेथे असली आणि नकली कोळशाची मोठ्या प्रमाणात हेरफेर केली जाते. ते सहजासहजी कुणाच्या लक्षातही येत नाहीत. कोलमाफियांच्या टोळ्यांमधील गुंड, मजूर या ट्रक, टिप्परला आपल्या ठिय्यावर नेतात. याठिकाणी आलेल्या कोळशाच्या ट्रकचे सील जैसे थेच ठेवले जाते. त्याला हातही लावला जात नाही. मात्र, बेकायदा जेसीबीने ट्रकमधून उच्च दर्जाचा कोळसा काढला जातो आणि तेवढ्याच प्रमाणात त्या ट्रकमध्ये ओल्या कोळशाने मुलामा दिलेली गिट्टी, दगड अन् काळा चुरा भरला जातो. विशेष म्हणजे, या अलटा-पलटीच्या काही ठिकाणी धर्मकाटेही आहे. तेथे वजन केल्यानंतर हा ट्रक, टिप्पर भेसळयुक्त कोळसा घेऊन संबंधित उद्योजकाकडे, कारखान्यात पोहोचतो अन् तेथे माल सोडून परतही निघून जातो. इकडे त्या ट्रकमधून काढलेल्या अव्वल दर्जाच्या कोळशात दगड, गिट्टी आणि काळा चुरा मिसळून तो पुन्हा दुसऱ्या ट्रकमध्ये भरला जातो. अशाप्रकारे बनवाबनवी करून कोलमाफिया भेसळयुक्त कोळशाची लाखो रुपयांत विक्री करतात.

सारे काही उघड उघड

विशेष म्हणजे, कोळशाचा काळाबाजार तसेच चोरी आणि त्यात भेसळ करण्याचा गोरखधंदा उघड उघड केला जातो. त्यासाठी कोलमाफियांनी ठेवलेले रोजमजूर रात्रं-दिवस कोळशात हात काळे करताना दिसतात. अनेक ठिय्यांवर एका बाजूला कोळशाचे ढिगारे, दुसऱ्या बाजूला गिट्टी, चुरा अन् बाजूलाच दगड पडलेले ढिगारेही दिसतात. सारे काही उघड उघडच केले जाते.

Web Title: Black business of coal; Stone, ballast charcoal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.