गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह साकोली मतदारसंघातील 'त्या' गुंड मोदीचा शोध घेण्यास भाजपा उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 07:00 AM2022-01-18T07:00:00+5:302022-01-18T07:00:11+5:30

Nagpur News भाजपची अख्खी टीम गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह त्यांच्या साकोली मतदारसंघात गुंड मोदीचा रेकॉर्ड शोधू घेऊ लागली आहे.

BJP eager to search for 'that' goon Modi in Sakoli constituency including Gondia-Bhandara district | गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह साकोली मतदारसंघातील 'त्या' गुंड मोदीचा शोध घेण्यास भाजपा उत्सुक

गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह साकोली मतदारसंघातील 'त्या' गुंड मोदीचा शोध घेण्यास भाजपा उत्सुक

Next

 कमलेश वानखेडे

नागपूरः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता गुंड मोदींबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एका नव्या वादाला फोडणी घातली. मात्र, पटोले यांनी लगेच आपण पंतप्रधान मोदी यांच्याबाबत नव्हे तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोललो, असा खुलासा केला.

 त्यांनी हा खुलासा करताच भाजपची अख्खी टीम गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह त्यांच्या साकोली मतदारसंघात गुंड मोदीचा रेकॉर्ड शोधू घेऊ लागली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्तेही नेमका हा गुंड मोदी कोण आहे, कुठला आहे हे माहीत करून घेण्यासाठी उत्सुक आहेत. कदाचित स्थानिक पोलीसही बुचकळ्यात पडले असतील. त्यामुळे आता पटोलेंनीच सविस्तर खुलासा केला तर भाजपसह काँग्रेस कार्यकर्त्यांचेही परिश्रम वाचतील.

भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे रविवारी नाना पटोले यांनी, ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो,’ असे खळबळजनक वक्तव्य केले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

 

Web Title: BJP eager to search for 'that' goon Modi in Sakoli constituency including Gondia-Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.