कट्टरता कम्युनिस्टांनी आणली, हिंदूंनी नव्हे!  मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 11:06 PM2020-02-15T23:06:51+5:302020-02-15T23:09:42+5:30

कट्टरता हा शब्द भारतीय नाही. हा शब्द कम्युनिझममधून आलेला आहे. हिंदू किंवा संघ स्वयंसेवक निष्ठावान असतो, विचारक असतो. हिंदुत्व ही एक दृष्टी, तत्त्वज्ञान आणि विचारांचे बीज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.

The bigotry was brought by the Communists, not by the Hindus! Manmohan Vaidya | कट्टरता कम्युनिस्टांनी आणली, हिंदूंनी नव्हे!  मनमोहन वैद्य

कट्टरता कम्युनिस्टांनी आणली, हिंदूंनी नव्हे!  मनमोहन वैद्य

Next
ठळक मुद्दे पश्चिमेकडील शब्द आणि आपल्या विचारांत तफावतदुसऱ्या नागपूर लिटररी फेस्टिव्हलचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कट्टरता हा शब्द भारतीय नाही. हा शब्द कम्युनिझममधून आलेला आहे. हिंदू किंवा संघ स्वयंसेवक निष्ठावान असतो, विचारक असतो. हिंदुत्व ही एक दृष्टी, तत्त्वज्ञान आणि विचारांचे बीज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.
झील फाऊंडेशन व नागपूर लिटरेचर फाऊंडेशनच्या वतीने उत्तर अंबाझरी मार्ग, सीताबर्डी येथील सोहम सभागृहात दुसºया द्विदिवसीय नागपूर लिटररी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. रजनीश शुक्ल, सच्चिदानंद जोशी, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर, जनरल ए.एस. देव उपस्थित होते.
पाश्चिमात्यांना आपले विचार, आपली संस्कृती इतरांवर लादण्याची सवय आहे. प्रत्येकाची विचारप्रणाली भिन्न असते आणि त्यातूनच शब्दांची निर्मिती होत असते. त्यामुळे आपल्या स्वभावाला परिचायक असलेल्या आपल्याच शब्दांचा वापर आपण करणे योग्य ठरेल. पश्चिमेकडील शब्दांचे अनुवाद आपल्या भावनेशी निगडित शब्दांशी जोडले तर विपर्यास होईल. येथील संस्कृतीत जीवनाचे चिंतन आध्यात्मिक आहे आणि म्हणूनच भारत एक व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येतो. ‘टॉलरन्स’ हा शब्द आपल्यासाठी अत्यंत गौण आहे. मात्र, तो आजकाल सर्रास वापरला जात आहे. आपल्याला त्या शब्दाच्या अर्थाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागणार असून, भारतीय विचार विभक्त होण्याचा नाही तर सामावून घेण्याचा असल्याचे मत डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले. धर्म हा आचरणाचा भाग आहे आणि तो व्यक्तिपरत्वे बदलतो. आपल्याकडे देण्याच्या वृत्तीला, कर्तव्याला, जबाबदारीला धर्म संबोधले गेले आहे. म्हणून आपली धर्माची संकल्पना जोडण्याशी निगडित आहे, तोडण्याशी नव्हे. जो समाज राज्यव्यवस्थेवर निर्भर असतो, तो निस्तेज असतो. म्हणून पुरुषार्थ कमावण्याची सवय समाजाला लावावी लागेल, असे आवाहन वैद्य यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार सई देशपांडे यांनी मानले.

Web Title: The bigotry was brought by the Communists, not by the Hindus! Manmohan Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.