Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:34 IST2025-12-02T11:34:17+5:302025-12-02T11:34:17+5:30
Maharashtra Election Result 2025 Date: नगर परिषदचा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला लागणार आहेत.

Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
Maharashtra Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नरगपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या. आज राज्यात नगरपरिषदा आणि नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होते. पण, आता या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहेत.
निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. निकाल पुढे ढकलण्याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबत कोर्टाने आज निकाल दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार होत्या व त्याचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर केला जाणार होता. परंतु, निवडणूक आयोगाने सदस्यपदाच्या उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहेत तिथे केवळ संबंधित प्रभागांच्या आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात याचिका दाखल आहेत तिथे संपूर्ण नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
त्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार संबंधित नगरपालिका व नगरपंचायती आणि प्रभागांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे तर, २१ डिसेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याविरुद्ध वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील उमेश कामडी व इतर दोघे आणि वरोरा येथील सचिन चुटे यांच्यासह इतर काहीजनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले.
प्रशासनावरचा ताण वाढणार
आज होणाऱ्या मतदानाचे सर्व ईव्हीएम मशिन २१ तारखेपर्यंत ठेवावे लागणार आहेत. यामुळे प्रशासनावर ताण येणार आहे.