बिग बी, नाना पाटेकर लावताहेत ‘आग’!

By admin | Published: August 31, 2016 02:21 AM2016-08-31T02:21:49+5:302016-08-31T02:21:49+5:30

अमिताभ बच्चन, नाना पाटेकर या दिग्गज अभिनेत्यांचा आवाज ऐकायला देशभरातील प्रेक्षक कानात प्राण

Big B, Nana Patekar is launching 'Fire'! | बिग बी, नाना पाटेकर लावताहेत ‘आग’!

बिग बी, नाना पाटेकर लावताहेत ‘आग’!

Next

नागपूर : अमिताभ बच्चन, नाना पाटेकर या दिग्गज अभिनेत्यांचा आवाज ऐकायला देशभरातील प्रेक्षक कानात प्राण आणून सज्ज असतात. परंतु याच आवाजाने नागपुरातील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे. काही खोडसाळ वृत्तीचे लोक अमिताभ बच्चन,नाना पाटेकर यांच्या आवाजाची नक्कल करून शहरात आग लागल्याचे कॉल करीत आहेत. अशा फेक कॉल्सचे प्रमाण इतके वाढले आहे की आता तर अग्निशमन दलाचा कर्मचारी फोन उचलायलाही घाबरत आहेत.
शहरात कुठे आग लागल्यास मनपा अग्निश्मन मुख्यालयाच्या १०१ या आपातकालीन फोन नंबरवर फोन केले जातात. परंतु काही खोडसाळ मंडळी या क्रमांकावर टाईमपासाठी फोन करून कर्मचाऱ्यांची थट्टा करीत असतात. फोन महत्त्वाचा असेल म्हणून तो टाळता येत नाही आणि फोन उचलला तर पलिकडून कधी नाना पाटेकर तर कधी अमिताभ बच्चन यांचे नाव सांगितले. कधीकधी तर चक्क ‘मी विजय दीनानाथ चव्हाण बोलतो. माझ्या मांडवा गावात आग लागली आहे’, असे डॉयलॉगही ऐकायला येतात. या प्रकाराचा विरोध केला तर फोन करणारे अश्लील शिवीगाळ करतात. रात्री-बेरात्री कधीही असे कॉल्स येत असल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. (प्रतिनिधी)

महत्त्वाच्या नंबरचा दुरुपयोग
४संकटकालीन स्थितीत लवकर मदत मिळावी म्हणून कोणत्याही शहरात १००, १०१ हे फोननंबर महत्त्वाची भूमिका वठवत असतात. परंतु या क्रमांकावर जनतेला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांशी अशी अक्षम्य थट्टा केली जात आहे. अशा खोडसाळणामुळे येणाऱ्या प्रत्येक कॉलकडे शंकेने बघितले जात आहे.
पोलिसात तक्रारीचा उपयोगच नाही
४याबाबत अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, आम्ही या प्रकाराची तक्रार पोलिसात केली होती. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. असा खोडसाळपणा करणाऱ्या तरुणांमध्ये प्रगल्भतेचा अभाव आहे. परंतु याचा फटका ज्याला खरेच मदतीची गरज अशा लोेकांना बसू शकतो. अशा प्रकारचे फोन कॉल्स मोमिनपुरा आणि टिमकी क्षेत्रातून येत असल्याची माहिती असून त्या दिशेने तपास केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Big B, Nana Patekar is launching 'Fire'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.