भाई राखी ‘इंडियन’ है क्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 09:30 PM2020-07-24T21:30:10+5:302020-07-24T21:33:57+5:30

बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण सोमवार, ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सक्करदरा, सीताबर्डी बाजारासह शहराच्या विविध भागात राख्यांची दुकाने सजली आहे.

Bhai, Is Rakhi 'Indian'? | भाई राखी ‘इंडियन’ है क्या?

भाई राखी ‘इंडियन’ है क्या?

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांची खरेदीवेळी दुकानदारांना विचारणा : चीनविरुद्ध संताप, राख्या २० टक्के महाग

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण सोमवार, ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सक्करदरा, सीताबर्डी बाजारासह शहराच्या विविध भागात राख्यांची दुकाने सजली आहे. तरुणी आणि महिला खरेदी करीत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. ‘भाई राखी इंडियन है क्या’ असा पहिला प्रश्न महिला दुकानात पाय ठेवताच विचारत आहेत. भारतीयांमध्ये चीनविरुद्ध असलेला संताप यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

राख्यांमध्ये ‘मेड इन इंडिया’चा बोलबाला
यावर्षी कोरोनामुळे राखी बाजारावर परिणाम झाला आहे. दरवर्षी एक महिन्यापूर्वीच राख्यांची बाजारपेठ सजत होती. पण यावर्षी १५ दिवसापूर्वी बाजारात राख्यांची दुकाने पाहायला मिळत आहे. चिनी राख्यांच्या किमतीच्या तुलनेत यावर्षी भारतीय राख्या २० टक्के महाग झाल्या आहेत. १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत किंमत आहे. प्रत्येक राखीची कलाकुसर आकर्षक असल्याने प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे. मुलांसाठी कार्टुन कॅरेक्टरच्या अनेक राख्या उपलब्ध आहेत. यात डोरेमॅन, छोटा भीम आणि लायटिंगच्या राख्या आहेत. याशिवाय रेशीम धागे व चंदन राख्या, आर्टिफिशियल डायमंड राख्यांसह अनेक रंग आणि डिझाईनमध्ये राख्यांचे असंख्य प्रकार बाजारात दिसून येत आहेत. कोरोनामुळे तरुणी आणि महिला खरेदीसाठी कमी संख्येने घराबाहेर येत असल्या तरीही सणाच्या दोन वा तीन दिवसाआधी खरेदीला उत्साह राहील, असे इतवारी, शहीद चौकातील विकास जैन या विक्रेत्याने सांगितले.

बाजारात जुन्या चिनी राख्यांची विक्री
व्यापारी राजू माखिजा म्हणाले, ज्या व्यापाऱ्यांकडे गेल्या वर्षीच्या जुन्या चिनी राख्यांचा साठा आहे, ते त्या राख्यांची विक्री करीत आहेत. यंदा चिनी राख्या कोणत्याही ठोक व्यापाऱ्यांनी बोलविल्या नाहीत. बाजारातही भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी आहे. सध्या २५ टक्केही व्यवसाय झाला नाही. जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी संभ्रमात आहेत.

५ कोटींचा व्यवसाय यंदा २ कोटीवर!
नागपुरातून संपूर्ण विदर्भात राख्यांची विक्री होते. ठोक व्यवसाय एक महिन्यापूर्वीच सुरू होतो. पण यावर्षी कोरोनाचे संकट पाहता व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात राख्यांची खरेदी केली नाही. ऑड-इव्हनमुळे किरकोळ दुकानदारांनीही माल पडून राहण्याऐवजी हव्या तेवढ्याच राख्यांची खरेदी केली. याशिवाय गावखेड्यांमध्येही बाजार भरविण्यावर बंदी आहे. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनीही यावर्षी खरेदी थांबविली आहे. शहरातील आणि तालुका स्तरावरील फेरीवाल्यांनीही थोड्याच मालाची खरेदी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे गेल्यावर्षी जवळपास ५ कोटींच्या तुलनेत यंदा २ कोटींच्या व्यवसाय होण्याची शक्यता आहे. महिला दोन-चार दिवसापूर्वी राख्यांची खरेदी करतील, असे राजू माखिजा यांनी स्पष्ट केले.

Web Title: Bhai, Is Rakhi 'Indian'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.