नागपुरातील सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच : महापारांनी दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 09:30 PM2019-12-30T21:30:43+5:302019-12-30T21:31:34+5:30

सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाला अधिक विलंब न करता तलाव सौंदर्यीकरणाला तातडीने सुरूवात करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी सोमवारी दिले.

The beautification of Lake Sakkadara in Nagpur soon | नागपुरातील सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच : महापारांनी दिले निर्देश

नागपुरातील सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच : महापारांनी दिले निर्देश

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा अधिकाऱ्यासोबत केला पाहणी दौरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाला अधिक विलंब न करता तलाव सौंदर्यीकरणाला तातडीने सुरूवात करण्याचे निर्देश महापौरसंदीप जोशी सोमवारी दिले. प्रभागाचे नगरसेवक व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत महापौरांनीसक्करदरा तलावाचा पाहणी केली. प्रकल्पाची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक निर्देश दिले.
यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, नेहरूनगर नगर झोन सभापती समिता चकोले, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, नगरसेविका दिव्या धुरडे, रिता मुळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, उप अभियंता रुपराव राऊत यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते.
तलाव सौंदर्यीकरण संदर्भात अमीन अख्तर आणि निशिकांत भिवगडे यांनी माहिती दिली. प्रस्तावित विकास कामांचे नकाशे सादर केले. प्रस्तावानुसार तलावाला संरक्षक भिंत, तलावाच्या एका बाजुला उद्यान, एका बाजुने राजे रघूजी भोसले यांच्या जीवनावर आधारित म्युरल व त्यांचा जीवनपट असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एका बाजूस फूड कोर्ट, प्रशस्त उद्यान असणार आहे. तलावाच्या सभोवताल चालणाऱ्यांसाठी जॉगिंग ट्रॅक राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेश देण्याच्या मार्गावर काम आहे. कार्यादेश होताच कामाला सुुरुवात केली जाणार आहे.
सक्करदरा तलाव संवर्धन निधीसाठी महापालिकेतर्फे शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. यासाठी शासनाकडुन निधी आलेला आहे. आधीच उशीर झाला आहे, आता कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जोशी यांनी दिले. तलावातील स्वच्छतेसंदर्भात काय उपाययोजना करता येईल याचाही विचार करण्यात यावा, असेही महापौरांनी सांगितले. तलावात कचरा टाकला जावू नये यासाठी तलावाच्या सभोवताल ७ ते८ फुटाची सरंक्षक जाळी लावण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: The beautification of Lake Sakkadara in Nagpur soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.