वाघिणीशी झुंजीत अवनीची बछडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 09:37 PM2021-03-08T21:37:57+5:302021-03-08T21:39:53+5:30

Avni's cube injured आईपासून दुरावलेली अवनी वाघिणीची बछडी पीटीआरएफ-८४ हिला निसर्गमुक्त अधिवासात सोडले होते. मात्र तेथील वाघिणीशी झुंजीत जखमी झाल्याने चार दिवसातच तिला पेंचमधील एन्क्लोजरमध्ये परत आणण्यात आले आहे. ती जखमी असून तिच्यावर पेंचमध्ये उपचार सुरू आहेत.

Avni's cube injured in fight with another tigress | वाघिणीशी झुंजीत अवनीची बछडी जखमी

वाघिणीशी झुंजीत अवनीची बछडी जखमी

Next
ठळक मुद्देपायाला आणि कवटीला मार : पुन्हा परत आणले, उपचारानंतर सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आईपासून दुरावलेली अवनी वाघिणीची बछडी पीटीआरएफ-८४ हिला निसर्गमुक्त अधिवासात सोडले होते. मात्र तेथील वाघिणीशी झुंजीत जखमी झाल्याने चार दिवसातच तिला पेंचमधील एन्क्लोजरमध्ये परत आणण्यात आले आहे. ती जखमी असून तिच्यावर पेंचमध्ये उपचार सुरू आहेत.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील तितरामांगली कुंपणातून ५ मार्चला शुक्रवारी निसर्गमुक्त करण्यात आले होते. प्रथमच जंगलात गेल्याने तिच्या हालचालीवर वन विभागाचे पूर्ण लक्ष होते. व्हीएचएफ ट्रॅकिंग व उपग्रह टेलमेट्री आधारावर २४ तास ती निरीक्षणाखाली होती.

सोमवारी सकाळी जंगलातील अन्य वाघिणीशी झालेल्या झुंजीत ती जखमी झाल्याने तिच्यावर निरीक्षण करणाऱ्या चमूच्या लक्षात आले. याची खात्री पटल्यावर आणि ती जखमी झाल्याचे लक्षात आल्यावर तिला उपचारासाठी परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी पशुवैद्यकीय तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि सीडब्ल्यूएलडब्ल्यूशी सल्लामसलत केल्यानंतर परत आणण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून परत आणण्यात आले.

या संदर्भात पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या उजव्या कवटीवर दुखापत झाली असून पायालाही मार बसला आहे. असे असले तरी ती पूर्णत: सुरक्षित आहे. जमिनीवरून आणि उपग्रह सिग्नलच्या माध्यमातन चार दिवसांपासून निरीक्षण सुरू होते. निसर्गमुक्त केल्यावर ती जंगलात कसे जुळवून घेते हे महत्वाचे होते. वन विभागासाठी हा अभ्यासाचाही विषय होता, असे ते म्हणाले. डॉ. चेतन पतोंड आणि डॉ. सय्यद बिलाल तसेच इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिला परत आणण्याची कारवाई करण्यात आली. पुढील निर्णय घेईपर्यंत तिच्यावर देखरेख आणि उपचार केले जाणार आहेत.

जंगलात सोडल्यावर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची कल्पना होती. त्यामुळे तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजामध्ये तसा स्पष्ट उल्लेख यापूर्वीच केला आहे. ती ठणठणीत झाल्यावर वरिष्ठांच्या सूचनेनंतर तिला पुन्हा जंगलात सोडले जाईल.

 डॉ, रवीकिरण गोवेकर, प्रकल्प संचालक, पेंच

एन्क्लोजरमध्ये झाले होते प्रशिक्षण

२२ डिसेंबर २०१८ पासून पेंचच्या तितरामांगली येथील बंदिस्त एन्कोलजरमध्ये तिला शिकारीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देणे सुरू होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मानकानुसार हे प्रशिक्षण झाले आहे. पीटीआरएफ-८४ असे नाव देऊन रेडिओ कॉलर लावले होते. ती अवनीची बछडी असून अवनीला शूट केल्यावर ही बछडी केवळ १० महिन्यांची होती. आईकडून शिकारीचे प्रशिक्षण मिळाले नसल्याने तिच्या भवितव्याबद्दल वनविभागही चिंतीत होता. या काळात पेंचमध्ये ठेऊन संगोपन आणि प्रशिक्षित करण्यात आले.

Web Title: Avni's cube injured in fight with another tigress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.