नागपुरातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, पालकमंत्र्यांनी केली पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:12 AM2020-04-02T00:12:29+5:302020-04-02T00:14:11+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता योग्यरीत्या होत आहे किंवा नाही याबाबत ‘याचि देही याचि डोळा’ जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी नागपुरातील विविध बाजारपेठेत पाहणी केली.

Availability of essential commodities in the market in Nagpur, Guardian Minister inspected | नागपुरातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, पालकमंत्र्यांनी केली पाहणी 

नागपुरातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, पालकमंत्र्यांनी केली पाहणी 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता योग्यरीत्या होत आहे किंवा नाही याबाबत ‘याचि देही याचि डोळा’ जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी नागपुरातील विविध बाजारपेठेत पाहणी केली.
राणी दुर्गावती चौक, कांजी हाऊस चौक, कमाल चौक, इंदोरा बौद्ध विहार, शिवशक्तीनगर, गरीब नवाजनगर, टिपू सुलतान चौक, भांडार मोहल्ला येथे प्रत्यक्ष जाऊन भाजीपाला, फळ विक्रेत्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रास्त दरात जनतेला जीवनावश्यक वस्तू द्या, भाजी दुकानासमोर सामाजिक अंतर ठेवा, गर्दी होणार नाही, यासाठी चुन्याने खूण(मार्किंग) करण्याचा त्यांनी सल्ला दिला. बाजारातील नागरिकांना तोंडावर मास्क लावण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले.
तसेच खासगी किराणा व धान्य दुकानांमध्ये जाऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्याव्यात, भाववाढ, साठेबाजी आणि काळाबाजार करू नका, असे दुकान मालकांना सांगितले. आपात्कालीन परिस्थितीत जास्त दराने वस्तू विक्री करू नका, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारादेखील दिला. पालकमंत्र्यांनी विविध चौक, नगर, वस्त्यातील नागरिकांशी व्यक्तिश: संवाद साधला व शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा त्यांनी विश्वास दिला. याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Availability of essential commodities in the market in Nagpur, Guardian Minister inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.