अश्विन सेठी समूह व सेठी समूह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:36+5:302020-12-04T04:27:36+5:30

- नागपुरात व्हिव्हियाना मॉलची निर्मिती नागपूर : व्हिव्हियाना मॉलचा नागपुरात विस्तार करताना रिएलेटर्स अश्विन सेठ समूह नागपुरातील सेठी समूहासोबत ...

Ashwin Sethi Group and Sethi Group | अश्विन सेठी समूह व सेठी समूह

अश्विन सेठी समूह व सेठी समूह

Next

- नागपुरात व्हिव्हियाना मॉलची निर्मिती

नागपूर : व्हिव्हियाना मॉलचा नागपुरात विस्तार करताना रिएलेटर्स अश्विन सेठ समूह नागपुरातील सेठी समूहासोबत ६५० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे अश्विन सेठ समूहाने गुरुवारी म्हटले आहे.

प्रतापनगर जवळील एक दशलक्ष चौरस फूट व्हिव्हियाना मॉलच्या विकासासाठी दोन्ही समूहाने सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली असून एका महिन्यात औपचारिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील. या बांधकामासाठी अर्थसाहाय्य किंवा कालमर्यादा कशी राहील, यावर विस्तृत माहिती दिली नाही. पण मॉल नागपुरात सर्वात मोठा राहील आणि रामदासपेठ, धरमपेठ, धंतोली, प्रतापनगर, शिवाजीनगर आणि लक्ष्मीनगर या सारख्या समृद्ध शेजारच्या भागात असेल, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Ashwin Sethi Group and Sethi Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.