कचरा संकलन कंपन्यांची मुजोरी; सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 01:12 PM2021-07-28T13:12:50+5:302021-07-28T13:14:38+5:30

Nagpur News एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. ते सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाही, अशी तक्रार विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.

Arrogance by waste collection companies; Apart from ordinary citizens, they do not even pick up the phones of corporators | कचरा संकलन कंपन्यांची मुजोरी; सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाहीत

कचरा संकलन कंपन्यांची मुजोरी; सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाहीत

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्यांनी नोंदविला आक्षेपचौकशी समितीने कंपनी प्रमुखांचे मत मागितले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाने शहरातील कचरा संकलन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपनीकडे सोपविली आहे. परंतु कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. ते सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाही, अशी तक्रार विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.

कचरा संकलन कंपन्यांच्या कामकाजाबाबत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. मंगळवारी या समितीपुढे तानाजी वनवे यांनी आपले मत मांडले. वस्त्यांमध्ये सहा ते सात दिवसानंतर कचरा गाड्या येतात. नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करतात. पण नगरसेवकांच्या फोनला कंपनीचे अधिकारी प्रतिसाद देत नाही. कंपनीमध्ये नोकरी लावण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांकडून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप वनवे यांनी केला. यासंदर्भात कंपनी प्रमुखांचे मत मागविण्याचे निर्देश अविनाश ठाकरे यांनी दिले.

समिती सदस्य वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, नगरसेवक नितीन साठवणे, सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे,उपायुक्त राजेश भगत, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ. गजेंद्र महल्ले, निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्यासह दहाही झोनचे अधिकारी आणि दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

९ जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये आमदार प्रवीण दटके आणि विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत आपले मत मांडण्यांसदर्भात समितीकडे पत्र सादर केले होते. त्यानुसार मंगळवारी वनवे हे प्रत्यक्षात उपस्थित झाले तर आमदार प्रवीण दटके लेखी स्वरूपात आपले मत नोंदविणार आहेत.

कचऱ्याच्या ट्रकमध्ये माती

बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांच्याद्वारे दाखल व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये माती मिश्रीत कचरा असल्याचे गेल्या बैठकीत निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधित ट्रक चालक व मालक यांचे बयाण नोंदविण्यात आले. त्या सर्व बयाणांचे कंपनीच्या प्रतिनिधीकडून वाचन करण्यात आले.

पुरावे समितीपुढे ठेवा

दोन्ही कंपन्यांच्या कर्मचारी भरतीमधील भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांकडे कुठलेही पुरावे असल्यास त्यांनी ते समितीपुढे ठेवण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या अभिप्रायामध्ये मांडलेले मुद्दे गंभीर आहेत. याबाबत चौकशी होणे आवश्यक असल्याने संबंधित कंपनी प्रमुखांचे अभिप्राय नोंदविण्याचे निर्देश अविनाश ठाकरे यांनी दिले.

Web Title: Arrogance by waste collection companies; Apart from ordinary citizens, they do not even pick up the phones of corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.