कस्तूरचंद पार्कसाठी ऑडिटर नियुक्त करा : हेरिटेज संवर्धन समितीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 09:45 PM2020-09-11T21:45:35+5:302020-09-11T21:47:15+5:30

ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क हे नागपूर शहराचे वैभव आहे. येथील पुरातन वास्तूचे जतन व संवर्धनासाठी येथे डागडुजी, स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने ऑडिटरची नियुक्ती करून त्याचा अहवाल समितीपुढे सादर करा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीने शुक्रवारी संबंधित विभागांना दिले.

Appoint Auditor for Kasturchand Park: Directions of Heritage Conservation Committee | कस्तूरचंद पार्कसाठी ऑडिटर नियुक्त करा : हेरिटेज संवर्धन समितीचे निर्देश

कस्तूरचंद पार्कसाठी ऑडिटर नियुक्त करा : हेरिटेज संवर्धन समितीचे निर्देश

Next
ठळक मुद्देन्यायमूर्तींनी पाहणी केल्याने प्रशासन कामाला लागले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क हे नागपूर शहराचे वैभव आहे. येथील पुरातन वास्तूचे जतन व संवर्धनासाठी येथे डागडुजी, स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने ऑडिटरची नियुक्ती करून त्याचा अहवाल समितीपुढे सादर करा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीने शुक्रवारी संबंधित विभागांना दिले.
कस्तूरचंद पार्कच्या संदर्भात मनपा मुख्यालयात हेरिटेज संवर्धन समितीची बैठक झाली. नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, समितीच्या सदस्य डॉ.शुभा जोहरी, सदस्य अर्बन डिझायनर अशोक मोखा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एम. भानुसे, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पराग पोटे, महामेट्रोचे माणिक पाटील, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लि.चे श्याम मुंधडा आदी उपस्थित होते.
कस्तूरचंद पार्कच्या दुरावस्थेची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली. ५ सप्टेंबरला स्वत: न्यायमूर्तींनी कस्तूरचंद पार्कच्या दुरावस्थेची पाहणी केली. यावेळी न्यायमूर्तींनी दिलेल्या सूचनांनुसार हेरिटेज संवर्धन समितीला कस्तूरचंद पार्कमधील हेरिटेज स्ट्रक्चर व इतर जुने बांधकामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्तीसंबंधात सविस्तर प्लॅन तयार करून त्याचा अहवाल १७ सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे निर्देश आहे. त्या अनुषंगाने समितीची बैठक घेण्यात आली. सोमवारपर्यंत स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती जे.एम. भानुसे व अशोक मोखा यांनी दिली.

‘नो हॉकर्स झोन’घोषित करणार
कस्तूरचंद पार्कच्या सौंदर्यीकरणासोबतच या ठिकाणी दैनंदिन व्यवस्थापनाचे धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. याशिवाय या ठिकाणी मनपाच्या संबंधित झोनमार्फत पोलिसांच्या सहकार्याने याठिकाणी चालणाऱ्या बेकायदेशीर कार्याविरोधात सुरक्षा व्यवस्था करण्यात येणेही गरजेचे आहे. सुरक्षा भिंतीलगतच्या फूटपाथवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, हा भाग ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करून त्या संदर्भात मनपाचे संबंधित झोन आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करावी, असे निर्देश समितीद्वारे संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

Web Title: Appoint Auditor for Kasturchand Park: Directions of Heritage Conservation Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.