स्वरुप वेगळे, परंतु सर्वांचे मूळ एकच; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 12:14 PM2021-10-24T12:14:16+5:302021-10-24T12:15:17+5:30

nagpur news लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधार्मिय संमेलनाचे आयोजन ही सकारात्मक बाब आहे. धर्म जोणारा व प्रगतीकडे नेणारा असतो. परंतु मनुष्याची बुद्धी नकारात्मक असली तर त्याचा उपयोग करून लोक समाजाला तोडण्याचे काम करतात, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या.

Appearance different, but all have the same origin; Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat | स्वरुप वेगळे, परंतु सर्वांचे मूळ एकच; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

स्वरुप वेगळे, परंतु सर्वांचे मूळ एकच; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

Next

नागपूर; लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधार्मिय संमेलनाचे आयोजन ही सकारात्मक बाब आहे. वैविध्याला एकतेचे पोषण मिळते. स्वरुप वेगळे असले तरी सर्वांचे मूळ एकच असल्याचा विसर पडतो व त्यातूनच विद्वेष निर्माण होतो. आपण एकच आहोत याचे स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या.

 ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेच्या सुरुवातीला सरसंघचालक मोहन भागवत यांनी चित्रफितीच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा दिल्या.  (Appearance different, but all have the same origin; Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat)

 ते पुढे म्हणाले, मनुष्य धर्माला जगाला एकमेकांपासून तोडण्याचे शस्त्र बनवितो व चारित्र्यापासून खाली पाडतो. एकमेकांसमवेत परस्पर संवाद नसल्याने असे होते. विविधता हा जगाचा अलंकार असल्याचा भारताचा विचार आहे. वैविध्याला एकतेचे पोषण मिळते. स्वरुप वेगळे असले तरी सर्वांचे मूळ एकच असल्याचा विसर पडतो व त्यातूनच विद्वेष निर्माण होतो. आपण एकच आहोत याचे स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे. लोकमतच्या माध्यमातून हा संवाद सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. सार्थक उद्दीष्ट व सकारात्मकतेकडे नेणारी दिशा मिळेल असा विश्वास असल्याचे मत डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

Web Title: Appearance different, but all have the same origin; Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.