नागपुरात आणखी ४० ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:55 PM2020-09-16T22:55:25+5:302020-09-16T22:57:22+5:30

शहरातील कोविडबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावेत यासाठी यापूर्वी ६२ खासगी रुग्णालयांना ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात आता आणखी ४० रुग्णालयांची भर पडली आहे.

Another 40 'Dedicated Covid Hospitals' declared in Nagpur | नागपुरात आणखी ४० ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ घोषित

नागपुरात आणखी ४० ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ घोषित

Next
ठळक मुद्देआयुक्त राधाकृष्णन बी. यांचा महत्त्वपूर्ण निर्णय : १०२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कोविडबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावेत यासाठी यापूर्वी ६२ खासगी रुग्णालयांना ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात आता आणखी ४० रुग्णालयांची भर पडली आहे. शहरात १०२ खासगी रुग्णालयात कोविडचे उपचार केले जातील. रुग्णहिताच्या दृष्टीने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले.
शहरात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये सुरुवातीला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात. मात्र शहरातील वाढती स्थिती लक्षात घेता त्यानंतर काही खासगी रुग्णालयांना कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती. शहरातील वाढते संक्रमण लक्षात घेता आयुक्तांनी पुन्हा ४० रुग्णालयांचा यात समावेश केला.

४८ तासांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार
सध्या ४० रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. इतर रुग्णालयांमध्ये लवकरच उपचार सुरू केले जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली आहे. या रुग्णालयांमध्ये येत्या ४८ तासांमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्ण भरती करण्यात येतील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार सुरू करून रुग्णाचा रिअल टाईम डाटा मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्ययावत करणे रुग्णालय प्रशासनाला अनिवार्य राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नवे ४० डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल
परफेक्ट हेल्थ सुपर मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल धंतोली, न्यूक्लिअस मदर अ‍ॅण्ड चाईल्ड मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल, नेल्सन मदर अ‍ॅण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल सक्करदरा, श्रीकृष्ण हृदयालय अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर सेंटर, डॉ.के.जी.देशपांडे मेमोरिअल सेंटर फॉर ओपन हार्ट सर्जरी, मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल उंटखाना रोड, सेंट्रल इंडिया कार्डिओलॉजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, बोरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, तामसकर क्लिनिक रामदासपेठ, लोटस हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर अ‍ॅण्ड मॅटर्निटी होम, सफल हॉस्पिटल काँग्रेस नगर, प्रेस्टिज हॉस्पिटल छावणी, जी.टी. पडोळे हॉस्पिटल, खलाटकर हॉस्पिटल रेशीमबाग, श्रावण हॉस्पिटल अ‍ॅण्ड किडनी इन्स्टिट्यूट, रहाटे सर्र्जिकल हॉस्पिटल, ग्रीन सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड नर्सिंग होम, मुखर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आरएनएच हॉस्पिटल प्रा.लि., आदित्य हॉस्पिटल क्रिटिकल केअर अ‍ॅण्ड इमर्जन्सी सेंटर, खोब्रागडे चाईल्ड ट्रस्ट हॉस्पिटल अ‍ॅण्ड इन्टेन्सिव्ह केअर इन्स्टिट्यूट, आरोग्यम सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, कलर्स चिल्ड्रेन हॉस्पिटल, झेनिथ हॉस्पिटल शिवाजी नगर, तारांगण सर्जिकल हॉस्पिटल, सुपरलाईफ हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, एलिक्झिर मेट्रो सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर, अभियोग स्पाईन अ‍ॅण्ड जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर अँड मॅटर्निटी होम, कुबडे हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, जेनक्यूअर हॉस्पिटल, एस.एस. मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल, गार्सियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मेट्रो हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटल, आपुलकी वैरागडे हॉस्पिटल, शांती मोहन हॉस्पिटल, स्वस्तिक क्रिटिकल केअर, इंद्रायणी स्पेशालिटी हॉस्पिटल, ग्रेस हॉस्पिटल.

Web Title: Another 40 'Dedicated Covid Hospitals' declared in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.