आंबेडकरी नेते मुकुंद खैरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:44 AM2021-05-06T00:44:26+5:302021-05-06T00:46:08+5:30

Mukund Khaire passes awayज्येष्ठ आंबेडकरी नेते आणि समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष ॲड. मुकुंद खैरे यांचे बुधवारी अकाेला येथे काेराेनामुळे निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेता. धक्कादायक म्हणजे चारच दिवसांपूर्वी त्यांची मुलगी ॲड. शताब्दी खैरे यांचे तर गेल्या आठवड्यात खैरे यांच्या पत्नीचेही निधन झाले हाेते. काेराेनाने अख्या खैरे कुटुंबावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे.

Ambedkarite leader Mukund Khaire passes away | आंबेडकरी नेते मुकुंद खैरे यांचे निधन

आंबेडकरी नेते मुकुंद खैरे यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ज्येष्ठ आंबेडकरी नेते आणि समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष ॲड. मुकुंद खैरे यांचे बुधवारी अकाेला येथे काेराेनामुळे निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेता. धक्कादायक म्हणजे चारच दिवसांपूर्वी त्यांची मुलगी ॲड. शताब्दी खैरे यांचे तर गेल्या आठवड्यात खैरे यांच्या पत्नीचेही निधन झाले हाेते. काेराेनाने अख्या खैरे कुटुंबावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे.

ॲड. मुकुंद खैरे हे गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे कार्य करीत हाेते. बाैद्धगया महाविहार मुक्तीसाठी त्यांनी न्यायालयीन लढा चालविला हाेता, शिवाय देशात स्वतंत्र बुद्धिस्ट कायदा लागू करण्यासाठीही त्यांच्या नेतृत्वात न्यायालयीन लढा लढत नागपूरपासून दिल्लीपर्यंत अनेक आंदाेलने करण्यात आली. एलएलएममध्ये गाेल्ड मेडालिस्ट असलेल्या त्यांची मुलगी शताब्दीने बुद्धिस्ट कायदा हे पुस्तक लिहिले हाेते. तीही लहानपणापासून वडिलांसाेबत आंदाेलनात सक्रिय हाेती. आदिवासींच्या शेतजमिनी त्यांच्या नावावर करून देण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवून सर्वसामान्यांचे अधिकार आणि हक्क कायम ठेवले होते. मुकुंद खैरे हे आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते होते. खैरेंनी २००९ मध्ये अकोल्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. दुर्दैवाने विदर्भात आंबेडकरी चळवळीचा आधार मानल्या जाणाऱ्या खैरे बापलेकीचा कोरोनाने अंत झाल्याने चळवळीचे माेठे नुकसान झाल्याची भावना समाजात आहे.

Web Title: Ambedkarite leader Mukund Khaire passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.