अंबाझरीत बिबट्याने केली जंगली डुकराची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 10:24 PM2019-12-06T22:24:32+5:302019-12-06T22:39:55+5:30

कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट कैद झाला. बिबट्याने जंगली डुकराची शिकार सुद्धा केली होती. कॅमेरामध्ये शिकार घेऊन जाताना ट्रॅप झाला. वनविभागाला गस्त घालताना बिबट्याचे पगमार्क व विष्टा सुद्धा दिसली. त्यावरून अंबाझरी वनक्षेत्रात बिबट असल्याचे सिद्ध झाले.

In Ambazari leopard hunted wild boar | अंबाझरीत बिबट्याने केली जंगली डुकराची शिकार

अंबाझरीत बिबट्याने केली जंगली डुकराची शिकार

Next
ठळक मुद्देकाटोल रोडवरील गोकुल सोसायटीत बिबट दिल्याचा दावा : मिहानचा वाघ आज दिसला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरीच्या जंगलामध्ये गुरुवारी बिबट असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी सायंकाळी ६.१० वाजताच्या सुमारास अंबाझरीच्या आरक्षित जंगलाला लागून असलेल्या वाडीच्या भागात कक्ष क्रमांक ७९८ मध्ये लागलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट कैद झाला. बिबट्याने जंगली डुकराची शिकार सुद्धा केली होती. कॅमेरामध्ये शिकार घेऊन जाताना ट्रॅप झाला. वनविभागाला गस्त घालताना बिबट्याचे पगमार्क व विष्टा सुद्धा दिसली. त्यावरून अंबाझरी वनक्षेत्रात बिबट असल्याचे सिद्ध झाले.
गुरुवारी सकाळी अंबाझरी जैवविविधता पार्क क्षेत्रातील मेट्रो लिटील वूडच्या गवताळ परिसरात मजुरांनी बिबट्याला बघितले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आरएफओ आशिष निनावे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात प्रवीण बडोले, सचिन ताकसांडे, टेकाम, कवडस, बशीने व कुर्वे यांची टीमने पूर्ण परिसरात पायी गस्त घालून तपास केला होता. त्यानंतर अंबाझरीच्या गवताळ भागात व मैदानात ड्रोनच्या मदतीने बिबट्याला शोधण्यासाठी अभियान राबविले होते. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना पार्कच्या कक्ष क्रमांक ७९७ मध्ये बिबट्याचे पगमार्क दिसले होते. यानंतर पार्क पर्यटनासाठी बंद ठेवून बिबट्याचा तपास करण्यात येत होता. वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी अंबाझरीला लागून असलेल्या परिसरातील नागरिकांना सतर्कता ठेवण्याची अपिल केले होते.

गोकुल सोसायटीत दिसला बिबट
शुक्रवारी सकाळी गोरेवाड्या जवळील गोकुल सोसायटी परिसरातील सबीर गुप्ता यांना बिबट दिसला. सबीर गुप्ता यांनी सांगितल्यानुसार ते सकाळी ७.१५ वाजता मॉर्निंग वॉक करून घरी परतत होते. त्यांना सोसायटीला लागून असलेल्या झुडपात एक प्राणी दिसून आला. ते कुत्रा समजून काही पाऊल पुढे गेले. मग त्यांच्या लक्षात आले की, तो कुत्रा नसून बिबट आहे. त्यांनी परत झुडपामध्ये झाकून पाहिले तेव्हा तो बिबट्याच होता. ते धावत बिल्डींगमध्ये गेले. सबीर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना काही दिवसांपूर्वी बिल्डींगच्या पार्किंगमध्ये जंगली डुकराच्या मागे बिबट धावत असल्याचे दिसून आले होते. त्यांनी यासंदर्भात वन विभागाचे आरएफओ विजय गंगावने यांना सूचना दिली.

गोरेवाडा जंगलात सहा बिबट्याचा अधिवास
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोरेवाडा जंगलात बनलेल्या रेस्क्यू सेंटरमध्ये उपचाररत २२ बिबट आहे तर जंगलाच्या आतील क्षेत्रात ६ बिबट आहे. या बिबट्यांना गोरेवाड्याला लागून असलेल्या परिसरात दिसल्याची नवीन घटना नाही.

वाघ बोरगाव, मोंढा कडे
काही दिवसांपूर्वी मिहान परिसरात वाघ दिसला होता. हा वाघ बुटीबोरी वन परिक्षेत्रातील खडका व गुमगाव होत बोरगाव, मोंढाकडून जंगलात जात असल्याचे दिसून आले होते. बुधवारी रात्री ८.४५ वाजता हिंगणा रोड गुमगाव येथील भास्कर चावरे यांनी वाघ हिंगणा येथील मोंढा गावाकडे जात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर वाघ गुरुवार व शुक्रवारी खडका क्षेत्रातील कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला नाही.

Web Title: In Ambazari leopard hunted wild boar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.