९८८६ वीज कनेक्शन कापले तरी २८६ कोटीची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 12:43 AM2021-08-01T00:43:51+5:302021-08-01T00:44:20+5:30

Mahavitran महावितरणने मागील काही महिन्यांपासून थकबाकीदारांविरुद्ध वसुली मोहीम तीव्र केली. एकट्या जुलै महिन्यात ९,८८६ वीज कनेक्शन कापले. ५८४२ लोकांनी बिल भरून वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला; परंतु अजूनही नागपुरातील साडेचार लाखापेक्षा अधिक ग्राहकांवर २८६.८६ कोटी रुपयाची थकबाकी शिल्लक आहे. ही संख्या कमी करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट महिन्यात वीज कनेक्शन कापण्याची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Although 9886 power connections were cut off, arrears of Rs 286 crore | ९८८६ वीज कनेक्शन कापले तरी २८६ कोटीची थकबाकी

९८८६ वीज कनेक्शन कापले तरी २८६ कोटीची थकबाकी

googlenewsNext
ठळक मुद्देशहरी भागात ३,४६,९९९ ग्राहक थकबाकीदार, कारवाई आणखी तीव्र होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरणने मागील काही महिन्यांपासून थकबाकीदारांविरुद्ध वसुली मोहीम तीव्र केली. एकट्या जुलै महिन्यात ९,८८६ वीज कनेक्शन कापले. ५८४२ लोकांनी बिल भरून वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला; परंतु अजूनही नागपुरातील साडेचार लाखापेक्षा अधिक ग्राहकांवर २८६.८६ कोटी रुपयाची थकबाकी शिल्लक आहे. ही संख्या कमी करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट महिन्यात वीज कनेक्शन कापण्याची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्यात महावितरणचे दोन सर्कल आहेत. अर्बन (शहर) सर्कलमध्ये नागपूर शहरासह बुटीबोरी व हिंगण्याचा समावेश होतो. तर जिल्ह्यातील उर्वरित भागाचा समावेश ग्रामीण सर्कलमध्ये होतो. जुलै महिन्यात शहर सर्कलमध्ये ६६०४ व ग्रामीण भागात ३२८२ वीज कनेक्शन कापण्यात आले. राजकीय पक्षांनी याचा विरोध केला. आंदोलनेसुद्धा झाली. तरीही महावितरणने आर्थिक परिस्थिती पाहता मोहीम सुरू ठेवली. कंपनीचे म्हणणे आहे की, नागरिकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. त्यामुळे थकबाकी वसुली करणे गरजेचे आहे. दुसरीकडे नागरिकांचे म्हणणे आहे की, कोविड संकटामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळायला हवा. दरम्यान, थकबाकी वाढत चालली आहे. नागपूर शहर सर्कलचा विचार केला तर मार्च महिन्याची थकबाकी १७९ कोटी इतकी होती. यात ६९.२१ कोटीची आणखी वाढ झाली. वसुली माेहीम जोरात सुरू असतानाची ही परिस्थिती आहे. त्यामुळे महावितरणच्या सूत्रानुसार ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या थकबाकीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

 ग्राहकांनी बिल भरून सहकार्य करावे

ग्राहकांना चांगली सेवा तेव्हाच देता येईल जेव्हा बिल वेळोवेळी भरले जाईल. त्यामुळे पूर्ण राज्यात वसुली माेहीम सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांनी बिल भरून कंपनीला सहकार्य करावे.

दिलीप दोडके, मुख्य अभियंता, महावितरण.

शहरातील परिस्थिती

डिव्हीजन             मार्चनंतरची थकबाकी                         मार्चपर्यंतची थकबाकी

                         ग्राहक - रक्कम                                     ग्राहक - रक्कम

एमआयडीसी             २८,७७२ - ४.२२                                     १७४३५- ८.६३

सिव्हिल लाइन्स             ८१,७४६ - २१.९४                                     ८७,५६८ - ६४.६४

काँग्रेस नगर             ५७,००९ - ९.६७                                     ४१,४७५ - १७.९२

महाल                         १,०८,४४५ - २०.०१                                    १,१२,१९३ - ५२.८

गांधीबाग                        ६१,०२७ - १३.३७                                     ५६,५४२ - ३५.६८

--------------------------------------------------------------------------------------

एकूण                         ३,४६,९९९ - ६९.२१                         ३,१५,२१३ - १७९.६७

नोट : रक्कम कोटीमध्ये आहे. ही एकूण ग्राहकांची परिस्थिती आहे.

Web Title: Although 9886 power connections were cut off, arrears of Rs 286 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.