मुंबईसोबत औरंगाबाद एअरपोर्टलाही देण्यात आला होता अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:41 AM2021-05-08T00:41:53+5:302021-05-08T00:44:34+5:30

Air ambulance accident case एअर ॲम्ब्युलन्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी सायंकाळी मुंबईकडे झेप घेतली आणि १२ व्या वॉच टॉवरवरून या विमानाकडे सूक्ष्म नजर ठेवून असलेले सीआयएसएफचे हवलदार रवीकांता आवला काही क्षणासाठी चमकले. त्यांनी लगेच सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर रवीकुमार जी. यांना ॲम्ब्युलन्सचे चाक निखळून पडल्याची माहिती दिली. रविकुमार यांनी तत्काळ एअरपोर्ट सिक्युरिटी ॲथॉरिटीसोबत संपर्क साधला. खबरदारी घेतली नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते, हे लक्षात आणून दिले. त्यानंतर मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टला अलर्ट देण्यात आला आणि त्याचमुळे गुरुवारची मोठी संभाव्य दुर्घटना टळली.

Along with Mumbai, an alert was also issued to Aurangabad airport | मुंबईसोबत औरंगाबाद एअरपोर्टलाही देण्यात आला होता अलर्ट

मुंबईसोबत औरंगाबाद एअरपोर्टलाही देण्यात आला होता अलर्ट

Next
ठळक मुद्देम्हणून एअर ॲम्ब्युलन्सची दुर्घटना टळली : रविकांत आवला यांचा गौरवनागपूर एअरपोर्ट तब्बल चार तास होते संपर्कात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एअर ॲम्ब्युलन्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी सायंकाळी मुंबईकडे झेप घेतली आणि १२ व्या वॉच टॉवरवरून या विमानाकडे सूक्ष्म नजर ठेवून असलेले सीआयएसएफचे हवलदार रवीकांता आवला काही क्षणासाठी चमकले. त्यांनी लगेच सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर रवीकुमार जी. यांना ॲम्ब्युलन्सचे चाक निखळून पडल्याची माहिती दिली. रविकुमार यांनी तत्काळ एअरपोर्ट सिक्युरिटी ॲथॉरिटीसोबत संपर्क साधला. खबरदारी घेतली नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते, हे लक्षात आणून दिले. त्यानंतर मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टला अलर्ट देण्यात आला आणि त्याचमुळे गुरुवारची मोठी संभाव्य दुर्घटना टळली.

येथील एअरपोर्टवरून

इंधन भरून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक एक चाक निखळून पडले. या घडामोडी पासून विमानाचे चालक दल अनभिज्ञ होते. मात्र, सीआयएसएफचे हवालदार रवीकांत आवला यांनी तत्काळ आपले डेप्युटी कमांडंट रवीकुमार यांना ही माहिती कळविली.

त्यानंतर ही माहिती वैमानिकाला देण्यात आली. मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टवर माहिती देऊन इमर्जन्सी लँडिंगची तयारी ठेवण्याची सूचना करण्यात आली. योग्य आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज विशद करून नागपूरची यंत्रणा तब्बल चार तास सलग मुंबई एअरपोर्टशी संपर्कात होते. त्याचमुळे वैमानिकाने अत्यंत कौशल्याने विमान धावपट्टीवर उतरविले. एक अत्यंत मोठी दुर्घटना टाळण्यासाठी सीआयएसएफचे जवान रविकांत यांनी दाखवलेली सतर्कता लक्षात घेऊन सीआयएसएफच्या महासंचालकांनी रविकांत

यांना आज १० हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र जाहीर करून गौरविले. सीआयएसएफ महासंचालकांनी तशी घोषणा ट्वीट करत केली. सैन्याच्या प्रमुखांनीदेखील रविकांत यांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.या संबंधाने नागपूर एअरपोर्ट सीआयएसएफ युनिटचे डेप्युटी कमांडंट रवीकुमार यांनीही रविकांत यांचे कौतुक करून आज त्यांचा यथोचित गौरव केला.

ही सतर्कता प्रेरणादायी

रविकांत यांच्या सतर्कतेमुळे विमानातील रुग्ण, डॉक्टर आणि क्रू मेंबर बचावले.त्यांची सतर्कता सुरक्षा यंत्रणेतील प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे, असे रविकुमार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Along with Mumbai, an alert was also issued to Aurangabad airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.